Breaking News

जामखेडमध्ये बाल आनंद मेळावा उत्साहात


जामखेड ता.प्रतिनीधी : जामखेड तालुक्यातील खर्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुली दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने मोठया उत्साहात बाल आनंद मेळावा घेण्यात आला. 

कडाक्याची थंडी असतानाही बाल आनंद मेळाव्यासाठी सकाळी शाळांमध्ये बालगोपालांच्या किलबिलाटाने खर्डा शाळेत उत्साही अन आनंदी वातावरण निर्माण झाले होते. बालगोपालांनी गटा-गटाने बैठक मारत वेगवेगळ्या वेशभूषांनी स्वता:ला सजवले होते. दरम्यान शाळेच्या आवारात वेगवेगळ्याप्रकारचे स्टॉल लावले. कुणी भेळ, चॉकलेट, पाणीपुरी, भाजीपाला, शुभेच्छाकार्ड, सह, गोळ्या बिस्कीट, विविध प्रकारच्या वस्तु विक्रीस बालगोपाळ सज्ज झाले होते. व्यवहारिक ज्ञानाचे कृतीशील शिक्षण मिळणार असल्याने बालगोपालांच्या चेहर्‍यावर वेगळाच आनंद अन उत्सुकता झळकत, वेगवेगळ्या वेशभूषांनी सजलेले बालगोपाळ ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत होते. 


बाल आनंद मेळाव्यात उभारलेले विविध वस्तुंचे विक्रीच्या स्टॉलमधून व्यवहारिक ज्ञानाची निर्मिती होते. बालगोपालांना खरेदी विक्रीचा मिळणारा आनंद निराळाच असतो , जमा खर्चाचा ताळेबंदाचे ज्ञान मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर निर्माण होणार आनंद विलक्षण अनुभूती देणारा दिसुन येत होता. विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते संगीत खुर्ची, लिंबू चमचा, धावणे, खोखो विविध खेळाचा मुलांनी आनंद घेतला. तसेच विविध अन्नपदार्थाचा आस्वादही घेतला. 


यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुली मुख्याध्यापिका जयश्री मुकणे, प्राथमिक शिक्षक बाबुराव गिते श्रीहरी साबळे, सुवर्णा मानेकर, मनीषा काळे रत्नप्रभा शिरसाठ, अमोल घाटोळे, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले मुख्याध्यापिका ज्योती रासकर, प्राथमिक शिक्षिका ज्योती ढवळशंख, चंद्रकांत अरण्ये, सचिन अंधारे, दिनेश मोळकर, जानकीराम खामगळ यांच्या सह तालुक्यातील विदयार्थी, विदयार्थीनी, शिक्षक, शिक्षिका महिला सह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.