Breaking News

आश्रमशाळा प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी रमेश पोकळे यांच्या उपस्थितीत बैठक- ना.शिंदे


बीड,(प्रतिनिधी) : राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या उत्कर्षासाठी चालविण्यात येत असलेल्या सर्व आश्रमशाळा मधील कर्मचार्यांचे व संस्थाचालकांचे विविध प्रश्न अनेक वर्षापासुन प्रलंबीत आहेत. 

या प्रलंबीत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शिक्षकनेते रमेश पोकळे यांच्या उपस्थितीत लवकरच राज्यस्तरीय बैठक घेवून विविध प्रश्नांची सोडवणुक केली जाईल अशी ग्वाही राज्यचे वि.जा.भ.तथा जलसंधारण मंत्री ना.प्रा.राम शिंदे यांनी दिली. बीड भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांच्या अटल जनसेवक संपर्क कार्यालयास ना.प्रा.शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने राज्यातील विमुक्त भटक्या जमातींच्या उत्कर्षासाठी चालवण्यात येत असलेल्या आश्रमशाळामधील कर्मचार्यांच्या विविध प्रश्नांचे निवेदन शिक्षक नेते रमेशभाऊ पोकळे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.