Breaking News

अवैध वाळुप्रकरणी रहिमतपूर येथे तिघे ताब्यात


रहिमतपूर (प्रतिनिधी) : जायगाव (ता. कोरेगाव) दि. दहा रोजी चोरीची वाळू खाली करणार्‍या ट्रकवर कारवाई करत रहिमतपूर पोलिसांनी चोरीची वाळू व वाळू वाहतूक करणारा ट्रक असा एकूण पाच लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेत रहिमतपूर येथील तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. 10 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास जायगाव (ता. कोरेगाव) येथे जळगाव ते रहिमतपूर रोडवर दत्तमंदिराशेजारी दादापीर हाजीलाल तेगी (वय 30. रा.काशीदगल्ली रहिमतपूर) हा ट्रकमधून (क्रमांक : एमएच 11/5800) चोरीची वाळू खाली करत असताना आढळून आला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा शासकीय परवाना आढळून आला नाही. त्यामुळे चोरीच्या वाळू वाहतूकप्रकरणी त्याच्यासह गाडीमालक सागर जाधव (रा. सातारा) व त्याचा साथीदार विकास तुपे (रा. रहिमतपूर) या तिघांवर रहिमतपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार हवालदार मोहन आनंद कुलकर्णी यांनी पोलिसांत दिली आहे.