Breaking News

भाजपच्या खासदाराने तोडले अकलेचे तारे कर्जफेडीऐवजी शेतकरी मुलांना घेऊन देतो गाडी!


लखनऊ :  कर्जमाफीमुळे शेतकर्‍यांचे भले होणार नाही. शेतकरी कर्ज घेतात. त्यातील अर्ध्या पैशातून शेतीची कामे व अर्ध्या पैशातून मुलांना गाडी विकत घेतात. त्यामुळे शेतकरी कर्ज फेडू शकत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य उत्तर प्रदेशमधील भाजप खासदार वींरेद्र सिंह यांनी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवर प्रश्‍न उपस्थित करताना केले. 

खासदार वीरेंद्र सिंह म्हणाले, की कर्जमाफी करून शेतकर्‍यांचे भले होत नाही. त्यांचे कल्याण करायचे असेल, तर सामाजिक स्तर सुधरण्याची गरज आहे. ग्रामपंचायत मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. माझ्या भागात मी ग्रामपंचायत सुधारणावर भर देण्यास सुरुवात केली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसले आहेत. त्याबाबतची माहिती सरकारला देण्यात येईल. खासदार वीरेंद्र सिंह यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण होऊ शकतो. विरोधी पक्षांकडून केंद्रातील मोदी सरकारवर शेतकरी प्रश्‍नवरून निशाणा साधण्याचा नेहमी प्रयत्न केला जातो. आता वीरेंद्र सिंह यांचे वक्तव्य आल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलित आले आहे.