Breaking News

अवैध वाळू उपसा करणार्‍यांवर कारवाईश्रीगोंदा/प्रतिनिधी
वांगदरी येथील घोड नदी पात्रात अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या पथकाने छापा टाकून वाळू उपसा करणारे चार जेसीबी, चार टॅक्टर ताब्यात घेतले. सुमारे 60 लाखांचा मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतला. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. श्रीगोंदा पोलिस व महसुल यांच्या कृपेने वांगदरी शिवारात बेसुमार अवैध वाळू उपसा चालू असल्याची माहिती मीना कुमार यांना समजली. त्यांनी भीमा नदीत वाळू तस्करीच्या विरोधात कारवाई करावयाची आहे. असे सांगुन पोलिस पथक साथीला घेतले. ढोकराई फाट्यावर येताच मोर्चा वांगदरीकडे वळवला. त्यामुळे वाळू तस्करांच्या खबर्‍यांना थांगपत्ता लागण्यापूर्वी घोड नदीत छापा टाकला.