प्रवाशांची डोकी वाचविताना पोलिसांची होते डोकेदुखी


दोन हजार चालकांवर कारवाई, सात हजार दंड वसूलअहमदनगर/प्रतिनिधी

नगर शहरात प्रवाशांना हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. हा पोलिसांचा उपक्रम नसून वाहतुकीचे नियम तोडणार्‍यांवर कारवाई आहे. हे नियम जनतेच्या हीतासाठी असून त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा पोलिसांकडून करण्यात आली आहे. मात्र, हेल्मेटसक्ती सुरू असतांना साधारण व्यक्तीस जरी पकडले तरी तो नगरसेवक, पुढारी, पत्रकार किंवा अन्य लोकप्रतिनिधींचा दबाव आणण्याचा प्रयत्न करतो. अर्थात पोलिसांनी कोणाचे एकले नाही. तर, ते नेहमीप्रमाणे टिकेचे धनी ठरतात. त्यामुळे हेल्मेटसक्ती म्हणजे प्रवाशांची डोकी वाचविताना पोलिसांचीच डोकेदुखी ठरताना दिसत आहे. तरी देखील 15 दिवसात दिड हजार विनाहेल्मेट धारकांवर कारवाई करुन 6 लाखांचा दंड व 700 विनाबेल्ट वाहन चालकांकडून एक लाख 36 हजार दंड वसूल केला आहे.

पुणे शहरानंतर नगर शहरात देखील हेल्मेटसक्तीचे वारे वाहु लागले आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी जिल्ह्यातील अपघात प्रमाणाचा आढावा घेतला होता. त्यात मृत्यू व जखमी होणार्‍यांची संख्या राज्यात मोठी होती. त्यामुळे त्यांनी हेल्मेटसक्तीचा नारा दिला होता. मात्र, दरम्यानच्या काळात त्यांची बदली झाली. त्यानंतर डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी देखील त्यांच्याच आवाजात आवाज मिसळविला. मात्र, हेल्मेटसक्ती करूनही ती यशस्वी झाली नाही. हे दोन्ही अधिकारी वैतागल्यानंतर एक मात्र लक्षात आले. नगरला शिस्तीची सवय नाही. त्यामुळे शहर वाहतूक शाखेत काम करण्यास अधिकारी धजत नव्हते. कधी बुलेट, अवैध रिक्षा, बाह्यवळण, हेल्मेटसक्ती, अवैध वाहतूक, अवजड वाहतूक, वाहतूक कोंडी, पार्किंग, अतिक्रमण अशा अनेक गोष्टींना तोंड देताना वाहतूक अधिकार्‍याच्या नाकीनव येत होते. मात्र, पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांनी बहुतांशी कार्यकाळ येथे पुर्ण केला आहे. अर्थात ते एक कार्यक्षम अधिकारी आहेत. म्हणून पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी त्यांच्यावर हेल्मेटसक्तीची जबाबदारी सोपविली आहे.

शहरात गेल्या वर्षाभरापुर्वी किरकोळ अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यात पोलीस कर्मचार्‍यांचा देखील सामावेश आहे. त्यामुळे पोलीस वाहतूक नियमन करण्यासाठी प्रयत्नशिल होते. मात्र, अशा अपघातांमध्ये डोक्याला मार लागल्याने मृत्युला सामोरे जावे लागले आहे. म्हणून हेल्मेट हे नियमांसाठी नव्हे, तर आपल्या प्राणाच्या सुरक्षेसाठी घालावे. असा अट्टाहास पोलीस प्रशासनाचा आहे. पोलीस अधिक्षक शर्मा हे समाभिमूख व संवेदनशिल व्यक्तीमत्व आहे. घरातून बाहेर पडलेला व्यक्ती सुखरूप घरी परतला पाहिजे, त्यासाठी सुरक्षित प्रवास होणे आवश्यक आहे. म्हणून हेल्मेटसक्ती हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात पोलिसांचा दुसरा हेतू नाही. त्यामुळे हेल्मेटसक्ती ही मजबुरी नाही. तर, गरज आहे. हे लक्षात घेऊन प्रत्येकाने त्यास प्रतिसाद द्यावा. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget