सोनवडी येथे मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर


परळी ( प्रतिनिधी) : कोणत्याही घरात आपल्या मुला-मुलीचा वाढदिवस म्हटलं की, मुलांबरोबरच आईवडिलांनीही मुलांइतकाच जल्लोष साजरा करण्याची इच्छा असते. अलीकडे तर वाढदिवस म्हणजे हा एक प्रकारचा सेलिब्रेशन इव्हेंट ठरू लागला आहे. त्यातून काही लोक समाजाचे ऋण म्हणून वाढदिवसानिमित्त अनाथआश्रम किंवा मूकबधिर शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करतात. मात्र, सोनवडी येथील विकास कारंडे आणि कुटूंबियांनी त्यांच्या घरी जन्मलेल्या बालिकेचा पहिला वाढदिवस रक्तदान शिबिराचे आयोजन करून साजरा करीत अनोखी सामाजिक बांधिलकी जपली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, सोनवडी येथील विकास कारंडे व त्यांचे कुटुंबिय हे नेहमीच सामाजिक उपक्रमात सहभागी असणारे कुटूंब असून त्यांनी मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला केक न कापता व फुगे न फोडता गावात रक्तदान शिबिर घेत साजरा केला. या शिबिरात नवयुवकांपासून शंकर कारंडे यांच्यासह विविध वयोगटातील नागरीकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. मुळातच विकास कारंडे हे परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर असतात वृक्ष लागवड व्यसनमुक्तीवर त्यांचे काम सुरू आहे. सन 2005 पासून वार्षिक दोन वेळा नियमित रक्तदान ते करत असतात. वाढदिवसादिवशी कोणते सामाजिक कार्य करायचे असा कुटुंबियांबरोबर विषय सुरू असतानाच साता़र्‍यातून एका ब्लड बँकेमधून त्यांना फोन आला की तुमचा रक्तगट असलेल्या रक्ताची तात्काळ गरज आहे. जर तुम्हाला शक्य नसेल तर ओळखीचा रक्तदाता असले तर त्यास पाठविण्याची विनंती केली. मात्र, यावेळी कोणीही उपलब्ध होऊ शकले नाही याची खंत वाटली. आज जी वेळ कोणावर आली आहे तीच वेळ परत कोणावर येऊ नये व आम्ही कुटुंबियांनी आपल्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला रक्तदान शिबिराने साजरा करण्याचा निर्णय घेतला. परिवर्तन व्यसनमुक्ती संस्थेचे समुपदेशक व्याख्याते किशोर काळोखे यांच्या प्रेरणेतून ही संकल्पना मनात रुजली. 26 डिसेंबर रोजी दीपिकाच्या पहिल्या वाढदिवसाला पंचवीस जणांनी रक्तदान केले. दरवर्षी अशाच पध्दतीने वाढदिवस साजरा करून रक्तदात्यांची संख्या ही वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे विकास कारंडे यांनी सांगितले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget