Breaking News

थोरात महाविद्यालयात रविवारी माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे आयोजन


संगमनेर/प्रतिनिधी
 सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयामध्ये महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीची संकल्पना जाणून घेण्यासाठी व विविध विषयांसाठी माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी रविवार दिंनांक 9 रोजी सकाळी 9.00 वा. आ. बाळासाहेब थोरात व संस्थेचे अध्यक्ष आ. डॉ.सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे यांच्या उपस्थितीत सर्व माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.दातीर यांनी दिली आहे.