Breaking News

भारीप बहुजन महासंघाच्या उमेदवारांना विकासासाठी विजयी करा : सोनवणे


अहमदनगर/ प्रतिनिधी :
भारीप बहुजन महासंघाच्या वतीने महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण आठ उमेदवार रिंगणात आहेत. विकासाच्या मुद्यावर भारीप बहुजन महांसघाने ही निवडणुक लढविण्याचे ठरवले आहे. यासाठी नगरकरांनी भारीपच्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष अशोकराव सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. 

यावेळी भारीपचे उमेदवार प्रभाग क्र. 15 अ मधून संदिप विश्‍वनाथ गायकवाड, प्रभाग क्र. 10 अ मधुन सुशांत गिरीधर म्हस्के असे अधिकृत उमेदवार व पुरस्कृत उमेदवारामध्ये प्रभाग क्र. 9 अ मधून स्नेहल गौरव आल्हाट, प्रभाग क्र. 9 ब मधून मेरी सुनिल केदारी, प्रभाग क्र. 15 क मधून मदिना फिरोज पठाण, प्रभाग क्र. 17 अ मधून राहुल गोरख जाधव , प्रभाग क्र. 16 अ मधून गायत्री प्रशांत चोरडीया तर प्रभाग 16 ब मधून आशाताई साहेबराव विधाते हे उमेदवार भारीप बहुजन महसंघाचे अधिकृत व पुरस्कृत पाठींब्यावर उभे आहेत. अशी माहिती नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष अशोकराव सोनवणे दिली. यावेळी जिल्हा महासचिव दिलीप साळवे , शहर जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब घुगे, शहर जिल्हा महासचिव सुनिल शिंदे , युवक जिल्हाध्यक्ष योगेश साठे, विनोद गायकवाड, जिवन कांबळे, भाऊ साळवे आदी उपस्थित होत. शहरातील विविध प्रश्‍न बाजुला ठेवुन आजची निवडणुक ही इतर पक्ष साटेलोटे करुन लढवत आहेत. तसेच यंदाच्या निवडणुकीत घराणेशाही जोपासली आहे. याला बाजुला सारुन सर्वसामान्यांच्या प्रश्‍नावर आमच्या पक्षाचे उमेदवार ही निवडणुक लढवत आहेत. त्यांच्या पाठीशी जनता उभी असून निश्‍चितच सर्व उमेदवारांना सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांची जान असल्याने ते भविष्यात सर्वांना बरोबर घेऊन काम करतील तसेच नगरचा खोळंबलेला विकास करतील. शहरातील वाहतुक समस्या, पाणीप्रश्‍न, ड्रेनेज लाईन, पर्यान विकास, खड्डे मुक्त नगर आदी विषय घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहेत. नगरच्या जनतेच्या समोर असलेले डिजीटल नगर शहराची रचना करण्यासाठी आमचे उमेदवार प्रयत्नशील राहतील. तसेच येणार्‍या निधीचाही योग्य वापर करतील असा विश्‍वास सोनवणे यांनी नुकताच व्यक्त केला.