Breaking News

भिलारला शनिवारी ‘गुण गाईन आवडी’सातारा
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे, आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगुळकर आणि स्वरतीर्थ सुधीर फडके या तीनही प्रतिभावंतांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून त्यांचे स्मरण करण्यासाठी शनिवार, दि. 8 डिसेंबर रोजी भिलार, ता. महाबळेश्‍वर या पुस्तकांच्या गावातील खुल्या प्रेक्षागृहात, सायंकाळी साडेेपाच वाजता ‘गुण गाईन आवडी’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राज्य मराठी विकास संस्थेचे प्रभारी संचालक डॉ. आनंद काटीकर यांनी एका पत्रकाद्वारे दिली.

भिलारमध्ये दि. 8 व 9 डिसेंबर रोजी राज्य मराठी विकास संस्थेच्या सहाकार्यातून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या माध्यमातून लेखक-प्रकाशक संमेलन होत आहे. यानिमित्ताने, मोठ्या संख्येने साहित्यिक आणि प्रकाशक भिलारला भेट देत आहेत, याबद्दल राज्याचे मराठी भाषा मंत्री श्री. विनोद तावडे यांनी आनंद व्यक्त केला केल्याची माहिती डॉ. काटीकर यांनी दिली.