Breaking News

जिल्हा परिषद शाळेत खाऊचे वाटपसोनई/प्रतिनिधी
राहुरी येथील जिल्हा परिषद शाळेत सुविधा अतिशय चांगल्या असून त्यामुळे विद्यार्थीनींना शिक्षणाची आवड निर्माण होऊन समाज सुशिक्षित होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन सरपंच विठ्ठलराव विटनोर यांनी केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांजरी येथे वितनोर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्याला प्रसिध्द व्यापारी भाऊसाहेब हजारे यांनी गोरगरीब मुलांना मिठाई, फरसाण, असे खाऊचे वाटप करतात. या शाळेत विद्यार्थींची संख्या वाढली पाहिजे, विदयार्थी घडले पाहिजे, अशी अपेक्षा हजारे यांनी व्यक्त केली. विद्यार्थी यांना खाऊ वाटपप्रसंगी दत्तात्रय जुंधारे, नाजीर तांबोळी, भाऊसाहेब हजारे, यांच्यासह मुख्यध्यापक, शिक्षक उपस्थित होते.