Breaking News

डेब्रिज घोटाळ्यात कार्यकारी अभियंता दोषी; सरकारच्या उत्तरातून संकेत; पन्नास मजुरांच्या कामाला आठशे मजूर!


मुंबई (विशेष प्रतिनिधी)- मंत्राालयातील डेब्रिज घोटाळा पुन्हा एकदा सभागृहाच्या ऐरणीवर आला आहे. गेल्या दीड वर्षापासून दै.लोकमंथन उपस्थित करीत असलेले प्रश्‍न सरकारची डोकेदुःखी ठरले आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व सदस्य अनंत गाडगीळ यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना उत्तर देत असतांना सरकारची झोप उडाली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शहर इलाख्याचे तत्कालीन कार्यकारी अभियंता दोषी असल्याचे संकेत सरकारच्या उत्तरातून मिळत होते.

2014-15 आणि 2015-16 या आर्थिक वर्षात मंत्राालयाच्या मुख्य आणि विस्तारीत इमारतीच्या नूतनीकरणाच्या वेळी जुन्या पाडलेल्या बांधकामाचे डेब्रिज (राडारोडा) मंत्रालयाच्या आवारात टाकण्यात आले. तेथून ते मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर डंपींगसाठी नेण्यात आले. या कामासाठी 97 लाख 83 हजार एवढा खर्च दाखविण्यात आला. डेब्रिज काढण्यासाठी 67 लाख 69 हजार तर त्याच्या वाहतुकीसाठी 30 लाख 14 हजार खर्च दाखविण्यात आला. तब्बल 900 ट्रक्स आणि 800 मजूर लावण्यात आल्याची नोंद शहर इलाखा बांधकाम विभागाच्या एमबीत करण्यात आली होती. आ.चरणभाऊ वाघमारे आणि दै.लोकमंथनने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर सरकारने केलेल्या चौकशीत डेब्रिज प्रकरणात तत्कालीन कार्यकारी अभियंत्यांनी केलेल्या गोंधळात गैरव्यवहार झाल्याचे आढळून आले. कार्यकारी अभियंत्यासह दोन सहअभियंत्यांना निलंबीत करण्यात आले होते; मात्र मूळ मुद्दा कायम होता. लोकप्रतिनिधींनी सभागृहात तर दै.लोकमंथनने सभागृहाबाहेर या डेब्रिज घोटाळ्याच्या चौकशीचे डंपींग होऊ दिले नाही. परिणामी गेल्या चार पाच अधिवेशनांप्रमाणे या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा पुन्हा सभागृहाच्या ऐरणीवर आला.

मुंडे आणि गाडगीळ यांनी या मुद्यावर लक्ष वेधून घेत सरकारचे चांगलेच वाभाडे काढले. डेब्रिज प्रकरणी शहर इलाखा बांधकाम विभागाच्या तत्कालीन दोन्ही कार्यकारी अभियंत्यांनी सरकारला तोंडघशी पाडून पारदर्शक कारभाराची लक्तरे विधिमंडळाच्या वेशीवर टांगल्याचे सदस्यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला मंत्री उत्तर देत असताना त्यांच्या देहबोलीतून जाणवत होते. 


अनुत्तरीत प्रश्‍न


-50 ट्रक डेब्रिज निघणे अपेक्षित असताना 900 ट्रक डेब्रिज आले कुठून?
-900 ट्रकचा आरोप खोडून काढताना सरकारकडून कधी 750 तर कधी 600 ट्रक डेब्रिज निघाले असे सांगितले जाते. मंत्राालयात एव्हढे डेब्रिज आले कुठून? 
- डेब्रिज काढण्यासाठी 50 मजूर अपेक्षित असताना 800 मजूर कसे दाखविण्यात आले? 
-एव्हढ्या मोठ्या कामाचे 20 तुकडे का पाडण्यात आले? 
-कुणासाठी हा द्राविडी प्राणायाम करण्यात आला?
-स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी म्हणजे 14 आगस्टला मंत्रालय परिसरात परवानगीशिवाय चिटपाखरूही फिरकू शकत नाही. मग, डेब्रिजच्या ट्रक मंत्रालयातून विनापास बाहेर गेले कसे? 
-डेब्रिजची वाहतूक करणारे शेकडो ट्रक पासशिवाय मंत्रालय परिसरात ये-जा करीत होते का?
-मुंबईत डंपींग ग्राऊंड उपलब्ध नाही. याचाच अर्थ मुंबईबाहेर डेब्रिजची विल्हेवाट लावली गेली. त्यासाठी मुंबई महापालिकेची परवानगी घेतली होती का?
-डेब्रिज मुंबईबाहेर नेणार्‍या वाहनांची टोल नाक्यांवर नोंद आहे का?
-आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी करून फौजदारी गुन्हा का दाखल केला जात नाही?
-सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाशिकचे मुख्य अभियंता हेंमत पगारे यांच्यामार्फत सुरू असलेली चौकशी का रेंगाळली? 
-