Breaking News

आजपासुन सर्वसामान्य वाहनधारकांसाठी हेल्मेट सक्ती
बीड, (प्रतिनिधी):- अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वाच्च न्यायालयाने देशभरात हेल्मेट सक्तीचा निर्णय घेतला. बीड जिल्ह्यात अनोख्या पद्धतीने हेल्मेट सक्तीचा निर्णय लागू करण्यास जिल्हा पोलिस अधिक्षक जी.श्रीधर हे कामाला लागले असुन मागील एक महिन्यापासुन पोलिस विभागाला हेल्मेट सक्ती केल्याने शहरात दुचाकी वाहने चालवणारे पोलिस हेल्मेट घातलेले दिसुन येत होते. पोलिस दलाला संपुर्णपणे हेल्मेट सक्ती केल्यानंतर आज दि.१७ पासुन सर्वसामान्य दुचाकी वाहनधारकांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. हेल्मेट सक्ती राबवण्यासाठी पोलिसांनाच हेल्मेट सक्ती करण्यात आली होती. परिणामी सर्वसामान्य दुचाकी धारकांना एक महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. उद्यापासुन शहरात तसेच जिल्ह्यात हेल्मेट सक्ती होणार असुन कायद्याचे पालन न करणार्‍यावर सक्तीने कारवाई होणार असल्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.