Breaking News

लोकांना अस्वस्थ करणारे लेखन साहित्यिकाला करता आले पाहिजे- लांडगे

                               
कर्जत/प्रतिनिधी
लोकांना अस्वस्थ करणारे साहित्य लेखन साहित्यिकाला करता आले पाहिजे. व याप्रमाणे अनेक ग्रामीण भागातील उत्तम प्रतीचे साहित्यीक तयार होत आहेत. असे प्रतिपादन अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिरीष लांडगे यांनी व्यक्त केले. कर्जत येथे साहित्य चळवळीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. 

        संत गोदड महाराज यांच्या पुण्यभूमीत व ना. सी. फडके यांची जन्मभूमी असलेल्या कर्जत तालुक्यातील साहित्यिकांना व्यासपीठ मिळावे, सर्वाना एकत्र येता यावे यासाठी सुरु झालेल्या कर्जत तालुका साहित्य चळवळीच्या वतीने येथील श्रद्धा हॅॅप्पी वर्ल्ड मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्द्ल डॉ. शिरीष लांडगे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्याचे साहित्याचे सामाजिक योगदान या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संदीप सांगळे हे होते. प्रथमत: आशिष बोरा यांनी प्रास्ताविक करताना तालुक्यात साहित्य चळवळ उभारणी साठी सुरु असलेल्या प्रयत्नाचा आढावा मांडला व भविष्यात विविध कार्यक्रम करण्याचा मनोदय व्यक्त केला. 

पनाजी कदम यांनी स्वागत केले. यावेळी भरत वेदपाठक, स्वाती पाटील, कवी येवले, तात्यासाहेब ढेरे, प्रमुख पाहुणे शांताराम चौधरी यांनी आपले मनोगते व्यक्त केली. शिरीष लांडगे यांनी कर्जत तालुक्यात नावाला जरी पूर्वी दुष्काळ असला तरी येथे साहित्यिकाचा सुकाळ असल्याचे सांगत जेष्ठ साहित्यिक ना. सी. फडके याचे हे जन्मगाव असून द. धी. पुडे, त्री ना. अत्रे, या लेखकाचा या तालुक्याला वारसा असल्याचे म्हटले. कर्जत तालुक्यात उभी राहत असलेली साहित्य चळवळ हा कौतुकाचा विषय असून  साहित्यिकांनी समाजातील सर्व घटकाकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे असे सांगताना आज मोठ्या व्यक्तीची नावे घेतली जातात मात्र त्याचा समृद्ध इतिहास वाचला जात नाही. असे सांगताना या थोर व्यक्तीचे विचार आचरणात आणण्याची गरज असल्याचे म्हटले. 

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आपल्या आकर्षक शैलीत विक्रम कांबळे यांनी केले तर शेवटी आभार समाधान पाटील यांनी मानले या कार्यक्रमासाठी पनाजी कदम, हिरामण येळपणेकर, दादा समुद्र कृष्णा राठोड, किसन महामुनी, सुशीला कुंभार, मनीषा सातपुते, उल्का केदारे, मिलिंद बागल, राहुल नवले, अशोक बचाटे, आदींसह अनेक साहित्य प्रेमी उपस्थित होते.