Breaking News

संगमनेर महाविद्यालयास पुणे विद्यापीठाची दोन सुवर्णपदके


संगमनेर/प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे संगमनेर महाविद्यालयातील कानवडे कावेरी रामदास (एम.एस्सी. फिजिक्स भाग-2) आणि सोनवणे दीपाली रामनाथ (एम कॉम भाग-2) या विद्यार्थिनिंची वर्ष 2018-19 मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे दिल्या जाणार्‍या ’’त्यागमुर्ती सरस्वती रामचंद्र शेलार सुवर्णपदक’’ यासाठी निवड करण्यात आलेली आहे. शैक्षणिक वर्ष 2017-18 साठी कानवडे कावेरी व शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी सोनवणे दीपाली हिची निवड करण्यात आलेली आहे. सदर सुवर्णपदकासाठी विद्यापीठाच्या निकषानुसार विद्यार्थी हा शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच नृत्य, वक्तृत्व, नाट्य व इतर कलांमधील सहभाग, वैयक्तिक व सांघिक क्रीडा स्पर्धा तसेच सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान, श्रमदान, साक्षरता व स्वच्छता मोहिम, आरोग्य विषयक जनजागरण, पर्यावरण रक्षण व प्रदुषण नियंत्रण, इ. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग असणे महत्वाचे असते. सदर निकषांमध्ये बसणार्‍या विद्यार्थ्यांचा प्रस्ताव विद्यापीठाकडून मागविण्यात आले होते.

 त्यानुसार वरील दोन्ही विद्यार्थिनिंनी विविध उपक्रम तसेच स्पर्धांमध्ये उत्स्फुर्तपणे आपला सहभाग नोंदवून अनेक परितोषिके मिळविलेली आहेत. त्यानुसार विद्यापीठाने सुवर्णपदकासाठी त्यांची निवड केल्याची माहिती संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.के. देशमुख यांनी दिली. सदर प्रस्तावासाठी शिष्यवृत्ती विभागातील विजय पाटील, जया भोसले, सोपान मंडलिक, भानुदास सोनवणे, तेजस देशमुख, मिनानाथ कवडे, आदींचे सहकार्य मिळाले.