Breaking News

जानकर म्हणतात 'धनगर आरक्षणापेक्षा मला पक्ष महत्त्वाचा


पशुसंवर्धन मंत्री आणि रासप अध्यक्ष महादेव जानकर यांची धनगर आरक्षणाबाबत एक ऑडिओ क्लिप सध्या प्रचंड व्हायरल झाली आहे. 'मला धनगर आरक्षणापेक्षा पक्ष महत्त्वाचा आहे, तुम्ही आधी पक्षाचं काम करा,' असं या ऑडिओ क्लिपमध्ये जानकर एका तरुणाला म्हणत आहेत.
एका धनगर तरुणाने महादेव जानकर यांनी धनगर आरक्षणाबाबतची विचारणा करण्यासाठी फोन केला. त्यानंतर जानकर यांनी त्या तरुणाला हे खळबळजनक उत्तर दिलं आहे. महाराष्ट्रात या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा होत आहे.