Breaking News

अंगणवाडीच्या वॉल कंपाऊंडचे काम निकृष्ट


शेवगाव/प्रतिनिधी
शेवंगाव तालुक्यातील चापडगाव येथील अंगणवाडीचे वॉल कंपाऊंडचे काम निकृष्ट झाले आहे. अशी तक्रार ग्रामस्थांनी केली, सदरन तक्रारीची दखल घेऊन सरपंच संजीवनी गायकवाड यांनी कार्यकारी अभियंता जि.प. अ.नगर मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. नगर, गट विकास अधिकारी पंचायत समिती, शेवंगाव, उपअभियंता पंचायत समिती, शेवगाव, जि. प.अध्यक्ष नगर यांचे कडे केली, सदर कामाची गुणवत्ता, गुणवत्ता नियंत्रकडून तपासून घेऊन संबधित ठेकदारावर कार्यवाही करण्याची मागणी सरपंच गायकवाड यांनी केली. काम निकृष्ट आढळून आल्यास सदर कामाचे बिल संबधित ठेकेदाराला अदा करू नये.

 सदर कामासाठी माती मिश्रित वाळु वापरण्यात आली आहे. तसेच सिमेंट अत्यंत कमी प्रमाणात वापरण्यात आले आहे. तसेच निकृष्ट काम असून एस्टीमटे प्रमाणे काम झाले नाही. तरी संबंधितांनी योग्य ती कार्यवाही करून ठेकेदारावर योग्य ती कार्यवाही करावी.