Breaking News

अटल महाआरोग्य शिबिराची खामगाव मतदार संघात सुरुवात
खामगाव,(प्रतिनिधी): आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनात खामगाव मतदार संघातील सर्व गावांमध्ये घरोघरी जाऊन जनसामान्यांचे आरोग्य तपासणीचे अभियान सुरु करण्यात आले आहे. मतदार संघातील प्रत्येक गावातील घरोघरी जाऊन अबाल वृद्धांची डॉक्टरांमार्फत तपासणी सुरु आहे. ग्रामीण भागांसह शहरात देखील हे अभियान सुरु आहे. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून गरीब शेतकरी शेतमजूर व इतर जनसामान्यांना आजारपणावर खर्च करणे शक्य नसल्यामुळे त्यांना केवळ मोफतच नाही तर घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्यात येणार आहे. 

यासाठी मतदार संघात तीनशे डॉक्टरांचा समूह आलेला असून 11 डिसेंबर पासून ग्रामीण भागात तपासणी सुरु करण्यात आली आहे. यामध्ये नेत्र तपासणी, अस्थिरोग, मेंदुज्वर, मूत्र रोग, कान, नाक आणि घसा, कर्करोग, श्‍वसन विकार, मानसिक आजार, हृदयरोग, जनरल सर्जरी, अवयव प्रत्यारोपण, बाल रोग, स्त्री रोग, ग्रंथीचे विकार यासह अनेक महत्त्वाच्या आजारांच्या तपासण्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून केल्या जाणार आहेत. 

या शिबिरात ज्या रुग्णांवर ऑपरेशन किंवा सर्जरी करण्याची गरज असेल, अशा रुग्णांना राज्यातील मोठमोठ्या रुग्णालयामध्ये तसेच विविध सेवा भावी ट्रस्टच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहे. मतदार संघातील अटल आरोग्य शिबिरा मार्फत तालुक्यातील पाळा या गावामध्ये आमदार आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शना खाली अटल आरोग्य विनामूल्य शिबिर राबवण्यात आले. नागरिकांच्या घरोघरी जाऊन आरोग्याची तपासणी करण्यात आली. यासोबतच आवार, जळका तेली, किन्ही महादेव, नागापूर, कोन्टी, पिंप्री गवळी, रोहणा, वर्णा, माटरगाव, यासह अनेक गावांतील रुग्णांची तपासणी करण्यात आली. ग्रामस्थांनी आरोग्यसेविका व आकाश फुंडकर यांचे या अमूल्य कार्य बद्दल आभार प्रगट केले. या अभियानात भाजप तालुका अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, जि.प.पं.स सभापती, उपसभापती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य यांचे सहकार्य लाभले आहे