Breaking News

अवसायकांची नामतालिका तयार करण्याचे काम सुरु


सातारा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 102 व कलम 110 (अ) अन्वये विभागातील अवसायनातील संस्थांचे कामकाजासाठी अवसायकांची नामतालिका (पॅनेल) तयार करण्याचे कामकाज सुरु आहे. यापूर्वी राबविलेल्या प्रक्रियेत ज्यांना अर्ज करता आलेले नाहीत, अशा इच्छुकांना अवसायक पॅनेल अर्ज सादर करण्यासाठी नव्याने वाढीव प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अर्जाचे विहित नमुने 31 जानेवारी 2019 पर्यंत विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर, उद्योग भवन असेंब्ली रोड, कोल्हापूर यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 जानेवारी 2019 अशी असून प्राप्त अर्जाची छाननी 15 फेब्रुवारी 2019 रोजी पूर्ण करुन 20 फेब्रुवारी 2019 पर्यंत प्रारुप नामिका प्रसिध्द करण्यात येणार आहे. 

28 फेब्रुवारी 2019 पर्यंत हरकती मागवण्यात येणार आहेत. त्यानंतर त्यावर निर्णय घेण्यात येईल. हरकतींचा निर्णय करुन 1 मार्च 2019 रोजी अंतिम नामीका प्रसिध्द करण्यात येईल. 
याबाबतची जाहीर सूचना कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात येईल, अशीही माहिती विभागीय सह निबंधक धनंजय डोईफोडे यांनी याबाबत सांगताना दिली.