घाटकोपरमध्ये घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात रास्ता रोको


मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात मंगळवारी घाटकोपर-अंधेरी लिंकरोडवर पारशीवाडी येथे नागरिकांनी रास्ता रोको केला. .

या मार्गावर असलेल्या मोकळ्या जागेच्या बाजूला आणि रस्त्याच्या किनाऱ्याला पालिकेच्या अनेक वर्ष जुन्या कचरा पेट्या ठेवलेल्या आहेत. पारशीवाडी, काजूटेकडी, कांबळे चाळ, रामू ड्रायव्हर चाळ, रामू शिंगाडे चाळ, अशी हजारोंची वस्ती असलेल्या विभागाला कचरा टाकण्यासाठी फक्त दोन कचरा पेट्या पालिकेने त्या ठिकाणी ठेवल्या आहेत. तसेच ज्या ठिकाणी आधी कचरा पेट्या होत्या तो विभाग पेव्हर ब्लॉक लावून सुशोभित करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. परंतु या ठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्याचा मानस काही लोकप्रतिनिधींचा असून, त्याला पालिकेतील काही अधिकारीदेखील मदत करत असल्याचा आरोप नागरिकांचा आहे. अशातच मंगळवारी सकाळी या ठिकाणी पालिका घनकचरा व्यवस्थापनाचे अधिकारी आले आणि त्यांनी नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता या कचरा पेटी उचलून नेण्यास सुरुवात केली. या वेळी त्यांना काही नागरिकांनी विरोधदेखील केला; परंतु काही लोकांची तक्रार असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांना उर्मट भाषा वापरली. अखेर काही विभागातील नागरिकांनी त्यांना पर्यायी व्यवस्था करा, तोपर्यंत कचरा पेट्या इथेच राहू द्या, असे सांगितले. यावर अधिकाऱ्यांनी होकार देत कारवाई थांबवण्याचे नाटक केले आणि संतप्त नागरिक घरी जाताच कचऱ्याचा पेटी गाडीत भरून निघून गेले. यावर संतप्त नागरिकांनी स्थानिक नगरसेवक सूर्यकांत गवळी यांना संपर्क साधून पालिका अधिकाऱ्यांच्या या कृत्याचा निषेध करून रास्ता रोको करत असल्याची सूचना दिली. काही वेळातच विभागातील शेकडो महिला-पुरुष घाटकोपर-अंधेरी लिंकरोडवर आले आणि त्यांनी दोन्ही बाजूची वाहतूक रोखून धरली. यात मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी देखील सामील होत जनतेबरोबर रास्ता रोको केला. अखेर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर निरगुडकर यांनी पालिका अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून नागरिक आणि अधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर हे कचऱ्याचे डबे पुन्हा तेथे बसवले..

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget