Breaking News

घराला आग लागुन वृद्धेचा होरपळून मृत्यू
गेवराई, (प्रतिनिधी):- शहरातील साठेनगर भागात एका घराला लागलेल्या भिषण आगीमध्ये वृद्ध महिलेचा होरपळून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल सकाळी उघडकीस आली.

गेवराई येथील साठेनगर भागात पुंजाबाई नाथा कापसे (वय ८०) या एकट्याच घरात रहात होत्या. घरामध्ये विजेची सोय नसल्याने त्या रॉकेलची चिमणी लावत होत्या. रात्री अचानक पुंजाबाई यांच्या घराला आग लागली. आगीची तिव्रता एवढी भिषण होती की पुंजाबाई कापसे यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. काल सकाळी हा प्रकार उघडकीस आला असुन घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली आहे. मयत पुंजाबाई कापसे यांचा मुलगा धोंडराईला राहत असल्याने त्या एकट्याच घरामध्ये होत्या. घरातील इतर साहित्याचीही राख झाली आहे