Breaking News

विवाहितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; तिघेही फरारबीड, (प्रतिनिधी):- पतीसह सासू आणि दिर यांनी सातत्याने छळ करत शिवीगाळ करुन मारहाण केल्यानंतर एका २८ वर्षीय विवाहितेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना नेकनूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध कलम ३०७ गुन्हा दाखल करण्यात आला असुन तिघेही फरार आहेत.

नेकनूर येथील शेख रहिमा शेख रशिद (वय २८) हिस पती शेख रशिद, सासू कोंदनबी दगडू शेख आणि दिर शेख आयुब हे सातत्याने त्रास देत होते. या संदर्भात पोलिसात तक्रार केल्यानंतर समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींनी मध्यस्थी करुन पुन्हा नांदवयास पाठवले. त्यानंतरही सासरच्या मंडळीकडून शेख रहिमा हिचा छळ सुरुच होता. दि.२ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास शेख रहिमा हिस सासरच्या लोकांनी मारहाण करुन तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. यामध्ये रहिमा जखमी झाली होती. 

पोलिसात तक्रार दिल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले होते. प्रकृती सुधारल्यानंतर दि.५ डिसेंबर रोजी शेख रहिमा शेख रशिद यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पतीसह सासु आणि दिर या तिघांनी मारहाण करुन अंगावर रॉकेल टाकून पेटवून देत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पती शेख रशिद शेख दगडू, दिर शेख आयुब शेख दगडू आणि सासु कोंदनबी शेख दगडू या तिघांविरुद्ध नेकनूर पोलिस ठाण्यात कलम ३०७, ४९८, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय सय्यद मजहर हे करीत आहेत. दरम्यान या प्रकरणातील तिन्ही आरोपी फरार असुन त्यांना तात्काळ अटक करावे अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.