घडलेले विद्यार्थी हीच खरी शिक्षकांची खरी बौद्धिक संपत्ती - गडाख


नेवासा/प्रतिनिधी
नेवासा येथील श्री ज्ञानेश्‍वर महाविद्यालयाचे भूगोल विषयाचे प्राध्यापक डॉ.पंढरीनाथ म्हस्के हे 32 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तनिमित्त सेवापूर्ती सोहळ्यात प्रा.म्हस्के यांना गौरविण्यात आले. शिक्षकांनी घडविलेले विद्यार्थी हेच खरी त्यांच्या दृष्टीने खरी संपत्ती असते असे प्रतिपादन नेवासा पंचायत समितीच्या मार्गदर्शक सुनिताताई गडाख यांनी यावेळी बोलताना केले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्रा. रघुनाथराव आगळे हे होते. तर मुळा एज्युकेशन सोसायटीचे सचिव उत्तमराव लोंढे, जयश्रीताई गडाख, कार्यालयीन व्यवस्थापक घुले, डॉ.विनायक देशमुख, माजी प्राचार्य रघुनाथराव आगळे, डॉ.भाऊसाहेब गवळी, डॉ. अशोक शिंदे, डॉ. अशोक एरंडे, प्रा. डॉ.शंकर लावरे, कृषी तज्ञ डॉ.अशोकराव ढगे, प्रा. डॉ.गोरक्षनाथ कल्हापुरे, अँड.के.एच.वाखुरे, अरुण घनवट, पांडुरंग उभेदळ, प्रा.अंकुश आहेर, प्रा.आजिनाथ चौधर, डॉ.रघुनाथ नजन, शिवाजीराव नवले, डॉ.भगत, प्रा.कारंडे, डॉ.आनंद पंडित, यांच्या सह पीएचडी झालेले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी ज्ञानेश्‍वर महाविद्यालयाचे प्रा. गोरक्षनाथ कल्हापुरे यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. प्रा.डॉ.अशोक साळवे, डॉ.अर्जुन मुसमाडे,प्रा. नारायण मोरे, डॉ.जालिंदर दराडे, डॉ.अशोक शिंदे यांनी प्रा.डॉ.पंढरीनाथ म्हस्के यांच्या कार्याचा गौरव आपल्या भाषणातून केला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget