Breaking News

आठवलेंवर झालेल्या हल्ल्याचा निषेध


पाथर्डी/प्रतिनिधी
अंबरनाथ येथे संविधान गौरव दिनाचा कार्यक्रम संपल्यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांना धक्काबुक्की करून अपमानित करण्यात आले. 

या घटनेचा निषेध व्यक्त करत पाथर्डी तालुका आर.पी.आय.कार्यकर्त्यांच्या वतीने पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांना निवेदन देण्यात आले. या प्रकरणातील हल्ला करणार्‍या प्रवीण गोसावी व या घटनेमागील सुत्रधारांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी बाबा राजगुरू, लाबन पगारे, नवनाथ तिजोरे, रवींद्र आरोळे, सुरेश भागवत, शिरुभाऊ दोडे, संजय शिरसाठ, बबन काळोखे आदी जण उपस्थित होते.