Breaking News

सातारा आरटीओच्या ब्रेक टेस्ट ट्रॅकचे लोकार्पणसातारा,(प्रतिनिधी) : येथील आरटीओ ऑफीसमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या ब्रेक टेस्ट ट्रॅकचे लोकार्पण बुधवारी खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या ट्रॅकमुळे वाहनधारकांची नोंदणीसाठी इतरत्र जाण्याच्या त्रासापासून सुटका झाली आहे.

सातारा येथे ब्रेक टेस्ट ट्रॅक नसल्याने वाहनधारकांना वाहन नोंदणीसाठी तसेच नूतनीकरणासाठी कराड येथे जावे लागत होते. कराड येथे जावे लागत असल्याने वाहनधारकांना नाहक भुर्दंड सोसावा लागत होता. हि अडचण ओळखून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी ट्रॅक तयार करण्याची कार्यवाही सुरु केली. यानुसार हा ट्रॅक तयार झाला असून त्याचे लोकार्पण बुधवारी झाले. यावेळी संजय धायगुडे, श्रीमंत तांदुळवाडकर, अरुण देसाई, जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई व परिवहन कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या ट्रॅकवर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी सात वाजता रिक्षा, टॅक्सी, टेप्पो यांची तर सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत ड्रायव्हिंग टेस्ट, नोंदणी व नुतनीकरणासाठी आलेली वाहने, दुपारी दोन नंतर ट्रक, टेम्पो, बस यांची चाचणी घेण्यात येणार आहे.