Breaking News

बुलडाणा बाजार समितीत शासकीय हमी भाव खरेदी केंद्राचा शुभारंभ बुलडाणा,(प्रतिनिधी):  येथील बाजार समिती मध्ये शेतकर्‍यांच्या सुविधेसाठी उडीद, सोयाबीन, मुगाच्या शासकीय हमी भाव खरेदी केंद्राचा शुभारंभ 4 डिसेंबर रोजी सभापती तथा शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत यांच्या हस्ते करण्यात आले.

 हमी भाव केंद्रावर शेतकर्‍यांनी उडीद, मूग, सोयाबीन विक्रीस आणावा, असे आवाहन बुधवत यांनी केले. येथील बाजार समितीमध्ये नाफेड व रुझ अ‍ॅग्रो कंपनी यांच्या संयुक्त विद्यमान उडीद, मूग, सोयाबीन या शेतमालाच्या शासकीय हमी भाव खरेदी केंद्राचे उद्घाटन पार पडले.  यावेळी महाराष्ट्र अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय उमाळकर, रुझ अ‍ॅग्रो कंपनीचे उपाध्यक्ष गणपतराव रहाटे, महाराष्ट्र अर्बनचे संचालक तुषार सावजी, रमेश चव्हाण, उपसभापती पंजाबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते काटापुजन करण्यात आले. तसेच उडीद, मूग विक्रीस आणलेल्या शेतकर्‍यांना रुमाल टोपी देवून सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक गौतम बेगाणी, गजानन उबरहंडे, प्रभाकर काळवाघे, सुनील गवते, संजय गाढे, सुरेश देढे, भगवान शेळके, सिंधुताई मुठ्ठे, अनिता पवार, श्रीकांत पवार, उत्तम कन्नर, राहुल सावळे, शेषराव अंभोरे, मनिषा उमेश अग्रवाल, बबन खरे, माणिकराव सावळे, भगवान एकडे, किसान सेना उप जिल्हाप्रमुख लखन गाडेकर, सचिव कु.वनिता साबळे यांच्यासह शेतकरी व बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.