Breaking News

मसूद शेख यांची अंबाजोगाई कॉंग्रेस सरचिटणीस पदी निवड


अंबाजोगाई (प्रतिनिधी) - पक्षाची विचार धारा ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी कॉंग्रेस पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी अंबाजोगाई सरचिटणीस पदी मसूद शेख यांची निवड केली आहे. निवडीचे पत्र १३ डिसेंबर १८ रोजी कॉंग्रेस बीड जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी तालुका कॉंग्रेस सचिव पदी बर्दापुर येथिल यशवंत रमेश हारनावळ यांची निवड करण्यात आली आहे.यावेळी कॉंग्रेस पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष राजकिशोर मोदी, तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे, रेवन सर, केज विधानसभा संघटक प्रताप देशमुख,जिल्हा युवक कॉंग्रेस सरचिटणीस रणजीत हारे, युवक कॉंग्रेस केज विधानसभा उपाध्यक्ष सचिन जाधव, युवक कॉंग्रेस तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पवार, सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष अतुल जाधव, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष शरद मोरे, अमोल मिसाळ, योगेश देशमुख व कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथील रहिवासी असून शेतकरी कुटुंबातील आहेत. मसूद शेख यांच्या निवडीबद्दल मित्र परिवाराकडून अभिनंदन करण्यात येत आहे.