Breaking News

सनराईज स्कुलमध्ये लसीकरण प्रारंभजामखेड ता./प्रतिनिधी 
जामखेड तालुक्यातील पाडळी येथील सनराईज शैैक्षणिक संंकुलातील सनराईज इंग्लीश स्कुुुलमधील विदयार्थीना गोवर व रूबेला लसीकरण मोहीमेचा प्रारंभ संस्थेेेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय भोरे व पाडळी गावचे संरपच शांतीलाल खैरे यांचे हस्ते करण्यात आला. या वेळी शासनाच्या लसीकरणाच्या मोहीमेचे व गोवर रूबेला बाबत मार्गदर्शन करण्यात आले. गोवर व रूबेला ही लस अत्यंत सुरक्षित आहेत ही लस 9 महीने ते 15 वर्षाच्या मुलां मुलीना एम.आर.लस टोचणे आवश्यक आहे. हे गोवर व रूबेला हे आजार प्राणघातक आहेत. त्याचा प्रसार विषाणू द्वारे होतो. यावेळी सनराईज स्कुलचा सर्व स्टाफ, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, व तसेच प्रा.जोगदंड, व स्टाफ, विदयार्थी, पालक, मोठया संख्येंने उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा.बहीर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.आयकर यांनी केले.