Breaking News

दखल - दंगलीच्या तप्त वातावरणावर मतांची पोळी!


मुझफ्फरनगर, दादरी आणि आता बुलंद शहर...या तीनही ठिकाणी दंगली झाल्या. विशेष म्हणजे निवडणुकीच्या काही दिवस अगोदर त्या घडविण्यात आल्या..त्यातलं आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे या तीनही दंगलीत भाजप, बजरंग दल, श्रीराम सेना, भारतीय जनता युवा मोर्चा या संघटनांशी संबंधित कार्यकर्त्यांचीच आरोपी म्हणून नावं पुढं आली...अजूनही दंगलीच्या तप्त वातावरणात मतांची पोळी भाजण्याचा हा प्रकार आहे, असं म्हणण्यास वाव आहे. 

मुझफ्फरनगरची दंगल आठवा. लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ही दंगल घडवून आणण्यात आली. भाजपचे आमदार सोम यांचा त्यात मुख्य सहभाग होता. अजूनही ते आरोपी आहेत. बलुचिस्तानमधील युट्यूबवरचे अपलोड केलेले व्हिडिओ दाखवून त्यात हिंदूवर मुस्लिमांकडून कसे अत्याचार होतात, असं सांगून हिंदूंना भडकावण्यात आलं होतं. ही दंगल जगाच्या इतिहासातील सर्वांत प्रदीर्घ काळ चाललेली आणि अधिक लोकांना विस्थापित करावं लागलेली म्हणून तिची नोंद आहे. या दंगलीच्या काळात अनेक महिलांवर अत्याचार झाले. पन्नास हजार लोकांना स्थलांतरित करावं लागलं. दीडशेहून अधिक लोकांचे प्राण गेले. जाटविरुद्ध मुस्लिम, हिंदूविरुद्ध मुस्लिम असं तिला स्वरुप देण्यात आलं. त्याचा परिणाम संपूर्णव्हिडिओ दाखवून त्यात हिंदूवर मुस्लिमांकडून कसे अत्याचार होतात, असं सांगून हिंदूंना भडकावण्यात आलं होतं. ही दंगल जगाच्या इतिहासातील सर्वांत प्रदीर्घ काळ चाललेली आणि अधिक लोकांना विस्थापित करावं लागलेली म्हणून तिची नोंद आहे. या दंगलीच्या काळात अनेक महिलांवर अत्याचार झाले. पन्नास हजार लोकांना स्थलांतरित करावं लागलं. दीडशेहून अधिक लोकांचे प्राण गेले. जाटविरुद्ध मुस्लिम, हिंदूविरुद्ध मुस्लिम असं तिला स्वरुप देण्यात आलं. त्याचा परिणाम संपूर्ण उत्तर प्रदेशावर झाला. मतांचं धुव्रीकरण झालं. भाजपनं लोकसभेच्या 72 जागा जिंकल्या. या दंगलप्रकरणी अजून कुणालाही शिक्षा झालेली नाही. त्यानंतर त्यातील गुन्हे मागं घेण्यात आले. हा सर्व प्रकार लक्षात घेतला, तर समाजमाध्यमाचा दुरुपयोग करून भाजप दंगल घडविण्यात आघाडीवर होता, हे स्पष्ट होतं. उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्टेशन डायरीत भाजपच्या आमदारांचं आरोपी म्हणून नाव होतं. संगीत सोम असं त्या आमदाराचं नाव आहे. वादग्रस्त वक्तव्यातही ते आघाडीवर आहेत. 

त्यानंतर तीन वर्षांपूर्वी दादरी हत्याकांड घडलं. केवळ गोमांस भक्षण केल्याच्य संशयावरून महंमद अखलक यांची हत्या करण्यात आली. त्यातही श्रीरामसेनेचा हात होता. अखलक कुटुंबीयांनी गोमांस खाल्ल्याचं सिद्ध झालं नाही. केवळ संशयावरून मंदिराच्या ध्वनिक्षेपकावरून उद्घोषणा करण्यात आली. जमावाला चिथवण्यात आलं. अखलक कुुटुंबाला नंतर गाव सोडावं लागलं. या प्रकरणात 18 जणांवर गुन्हे दाखल झाले. मॉब लिचिंगच्या प्रकारात अजूनही कुणालाच शिक्षा झालेली नाही. दादरी हत्याकांड देशभर गाजलं. त्यानंतर राजस्थान, महाराष्ट्र, हरयाणा, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश आदी भाजप शासित राज्यात मॉब लिचिंगचे असे अनेक प्रकार घडले; परंतु कुणावरही कारवाई झाली नाही. संशयित आरोपी सत्ताधार्‍यांशी संबंधित असल्यामुळं पुराव्यात कच्चे दुवे ठेवण्यात आल्याचा संशय आहे. छत्तीसगडमध्ये तर गोवंश हत्येच्या संशयावरून एकाची हत्या करण्यात आली. त्यातील आरोपींना जामीन मिळाला, तर केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. असं होत असेल, तर तपास यंत्रणा कशा तपास करणार, हा प्रश्‍न उरतोच. आता बुलंद शहरात कथित गोवंश हत्येवरून दंगलच घडविण्यात आली. त्यात जमावानं गोळीबार करून पोलिस निरीक्षकाचा बळी घेण्यात आला. उत्तर प्रदेशातील बुलंद शहरातील हिंसाचारातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून योगेश राज हा मुख्य आरोपी असल्याचं पोलिसांनी सांगितलं. योगेश राज हा बजरंग दलाचा नेता असून त्यानंच जमावाला चिथावणी दिल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे गोहत्येप्रकरणीही त्यानंच पोलिसांकडं तक्रार केली होती. गोवंश हत्या झाल्याचं कुठं दाखविता आलं नाही. केवळ अफवा पसरवून जमावाला भडकावण्यात आलं. लोकसभेच्या निवडणुका अवघ्या पाच-सहा महिन्यांवर आल्या असताना हा प्रकार घडल्यानं पुन्हा मतांच्या धुव्रीकरणासाठी तर अशा घटना उकरून काढल्या जात नाहीत ना, असा संशय घ्यायला जागा आहे.


बुलंद शहरातील हिंसाचाराचा तपास करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. या प्रकरणी 85 हून अधिक जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह यांच्या हत्येप्रकरणी चार जणांना अटक केली आहे. 300 ते 500 जणांच्या जमावानं पोलिस ठाण्याला घेराव घातल्याचं घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस उपनिरीक्षक सुरेश कुमार यांनी सांगितलं. योगेश राज आपल्या साथीदारांसोबत तिथं हजर होता. दुपारी 1 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास जमाव पोलिस ठाण्यावर पोहोचताच पोलिस निरीक्षकासह अन्य कर्मचार्‍यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला; मात्र हातात शस्त्रास्त्र घेऊन मोर्चात सामील झालेले लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी पोलिस निरीक्षक सुबोधकुमार सिंह यांच्याकडील परवाना असलेली पिस्तूल, मोबाइल फोन हिसकावला. तसंच वायरलेस सेटचीही तोडफोड करण्यात आली. योगेश राज हाच जमावाला चिथावणी देत होता, असा आरोप आहे. तर योगेश राजनं प्रतिक्रिया देताना हे आरोप फेटाळले होते. ‘मी घटनास्थळी होतो, पण मी जमावाला चिथावणी दिलेली नाही, हिंसाचार घडवणं हा आमचा उद्देश नव्हता’, असं त्यानं सांगितलं होतं.
बुलंद शहरामध्ये तीन दिवस एक धार्मिक कार्यक्रम सुरू होता. हा कार्यक्रम संपल्यानंतर गोहत्या झाल्याची माहिती नागरिकांना मिळाली. यानंतर परिसरात हिंसाचार सुरू झाला. महाव खेड्याच्या परिसरात हिंसक जमावानं पोलिसांवर दगडफेक केली. अनेक वाहनं पेटवून दिली. एका पोलिस चौकीला आग लावली. या हिंसाचारात स्याना पोलिस ठाण्यात तैनात असलेले पोलिस निरीक्षक सुबोधकुमार सिंह जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यास जमावानं अडथळे आणल्यामुळं त्यांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर हा हिंसाचार पाहत असलेला एक तरुण गोळीबारात ठार झाला.

योगेश राज हा बजरंग दलाचा जिल्हा अध्यक्ष असून या प्रकरणातील आणखी एक आरोपी शिखर अग्रवाल हा भाजपच्या युवा मोर्चाचा सदस्य आहे. विश्‍व हिंदू परिषदेचा सदस्य उपेंद्र राघव याचाही आरोपींमध्ये समावेश आहे. हत्या, हत्येचा प्रयत्न, जमावाला चिथावणी देणं, हिंसाचार अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अखलाक मृत्यू प्रकरणाचा तपास केल्यामुळंच सुबोधकुमार यांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्या बहिणीनं केला आहे. उत्तर प्रदेशमधील दादरी येथे 2015 साली महंमद अखलाक याची गोमांस बाळगल्याच्या संशयातून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सुबोधकुमार सिंह यांच्याकडंच होता. दादरी हत्याकांडाच्या वेळी सुबोध हे नोएडातील जारचा पोलिस ठाण्यात कार्यरत होते. आरोपींच्या अटकेसाठी सुबोधकुमार यांनी कठोर भूमिकाही घेतली होती. काही महिन्यांमध्येच त्यांची वाराणसीत बदली झाली. 2016 साली पोलिसांनी या प्रकरणात आरोपपत्रही दाखल केले. अद्याप या प्रकरणातील 18 आरोपींना शिक्षा झालेली नाही. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.