Breaking News

मुकुल वासनिक विधी महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा बुलडाणा,(प्रतिनिधी):  मुकुल वासनिक विधी महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध भाषेत संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेच्या संचालिका प्राचार्य मीनल आंबेकर, संचालक अ‍ॅड. दत्तात्रय चव्हाण, प्रा. चिमकर, प्राचार्या कोल्हे, प्रा. सावळे, प्रा. इंगळे, प्रा. वानखेडे, प्रा. ठाकरे, प्रा. तायडे, प्रा. चव्हाण यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ.आंबेकर म्हणाले की, लोकशाहीचे बीजारोपण संविधानात असून प्रत्येक भारतीयाने संविधानाचे वाचन व चिंतन करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

तर मीनल आंबेकर यांनी संविधानाने आपल्याला असलेल्या अधिकाराची जाणीव जाणीव करून दिली आहे. संविधानाचे योग्यरीत्या जतन करण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर संस्थेचे संचालक दत्तात्रय चव्हाण, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रशांत तायडे, पद्मजा दाभाडे, आदिल पठाण आपले विचार प्रगट केले. या प्रसंगी वैष्णवी पवार, रहिम शाह, कविता जायभाये, अर्शद खान यांनी हिंदी, मराठी, उर्दू, इंग्लिश अशा विविध भाषेतून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.

 कार्यक्रमाची सुरुवात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावित प्रा. अ‍ॅड. संतोष वानखेडे यांनी तर आभार प्रदर्शन ऋतुजा निकम या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अमोल शेरे, अमोल लहाने, शिवचरण टिकार, ज्ञानेश्‍वर पवार, पांडुरंग टेकाडे, विजय सिंगाळे याचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला विदर्भ युवक विकास संस्था द्वारा संचालित सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.