Breaking News

हॉटेलमधील लिफ्टच्या हौदात तरुणाचा मृतदेह आढळला

बीड, (प्रतिनिधी):- शहरातील शिवाजी चौकात असलेल्या हॉटेल मेघराज येथील लिफ्टच्या हौदात एका तरुणाचा मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना काल सकाळी उघडकीस आली. मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून तपास सुरु केला आहे. सदरील तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

बीड शहरातील शिवाजीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश रावसाहेब गेडगे (रा.मित्रनगर, बीड) हा आठ दिवसापुर्वी हॉटेल मेघराज रेस्टँरन्ट येथे कामाला होता. गेल्या तीन दिवसांपासुन तो बेपत्ता होता. आज सकाळी त्याच हॉटेलच्या बांधकाम सुरु असलेल्या लिफ्टच्या हौदात गणेश गेडगे याचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी शिवाजीनगर ठाण्याचे एपीआय शेवाळे, पीएसआय सांगळे, ढगारे, खेडकर, शेख सलीम यांनी भेट देवून पंचनामा केला आहे.