Breaking News

लोहोणेर जनता मध्ये मविप्र केंद्रस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाटन व पारितोषिक कार्यक्रम उत्साहात संपन्न


लोहोणेर(वार्ताहर ) : - लोहोणेर येथील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात मविप्र केंद्रस्तरीय सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र देवळा तालुका संचालक डॉ. विश्राम निकम होते. तर पमुख पाहुणे म्हणून शालेय समिती अध्यक्ष अनिल आहेर, भैय्यासाहेब देशमुख, गोविंद बागुल अशोक गुळेचा, सौ कमलताई देशमुख, अविनाश महाजन,डॉ.रविंद्र शेवाळे, आदींसह विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.एच;भदाणे व्यासपीठावर उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व नटराजाच्या पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आर.एच.भदाणे यांनी केले. अविनाश महाजन व अशोक गुळेचा यांनी मनोगत व्यक्त करत स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.विश्राम निकम यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत असताना या कार्यक्रमाचा हेतू सांगितला. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून हा सांस्कृतिक महोत्सव सुरु करण्यात आला असे त्यांनी सांगितले.सदर कार्यक्रमात समूहगीत, वैयक्तिक गीत गायन,एकपात्री नाट्यप्रयोग आणि वैयक्तिक नृत्य असे चार स्पर्धा प्रकार ठेवण्यात आले होते.सदर महोत्सवात मविप्र संस्थेच्या जनता विद्यालय लोहोणेर सह कळवण, पाळे, मोकभणगी, देवळा,वासोळ,कुंभार्डे, चिंचपाडा, पिंपळगाव(वा), बेज,रामेश्वर,पिळकोस,सावकी व खामखेडा आदी शाळा सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमात प्रथम व द्वितीय क्रमांक आलेल्या स्पर्धकांची नाशिक येथे होणार्या जिल्हास्तरीय मविप्र सांस्कृतिक महोत्सवासाठी निवड करण्यात आली. स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाप्रसंगी भैय्यासाहेब देशमुख, डॉ.रविंद्र शेवाळे, देवळा अभिनव मुख्याध्यापक निकम आदींसह मुख्याध्यापक आर.एच.भदाणे उपस्थित होते. त्याच्या हस्ते विजेत्या संघांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून बापू ठाकरे व के.एन.शेवाळे यांनी काम पहिले.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विद्यालयाचे शिक्षक एस.बी.एखंडे, आर.व्ही.पाटील, जे.पी.निकम, ए.व्ही.शिवदे, एम.के.गिरासे, एस.एल.जाधव,एम.डी.परदेशी आदींसह सर्व शिक्षक वृंद त्याचबरोबर शिक्षेकेत्तर कर्मचारी अमोल बोरसे, करण ठोके, तात्याभाऊ सोनवणे,संदीप पाटील आदींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विनित पवार यांनी केले. सदर स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे


* समूहगीत-: प्रथम- जनता विद्यालय लोहोणेर, द्वितीय-जनता विद्यालय पाळे, तृतीय- जनता विद्यालय चिंचपाडा,उत्तेजनार्थ-महात्मा फुले हायस्कूल बेज
* वैयक्तिक गीतगायन-: प्रथम- जनता विद्यालय लोहोणेर, द्वितीय-जनता विद्यालय पिंपळगाव(वा) तृतीय- जनता विद्यालय पाळे,उत्तेजनार्थ-जनता विद्यालय रामेश्वर
* एकपात्री नाट्यप्रयोग-: प्रथम- अभिनव देवळा, द्वितीय-जनता विद्यालय पिंपळगाव(वा), तृतीय- जनता विद्यालय लोहोणेर, उत्तेजनार्थ-जनता विद्यालय पाळे
* वैयक्तिक नृत्य-: प्रथम- जनता विद्यालय चिंचपाडा , द्वितीय- जनता विद्यालय कुंभार्डे , तृतीय-अभिनव कळवण , उत्तेजनार्थ-जनता विद्यालय लोहोणेर