Breaking News

देशभक्तीपर गीत पाठांतर स्पर्धा संपन्न.


शेवगाव/प्रतिनिधी
रेसिडेन्सिअल इंग्लिश मेडीअम स्कुल शेवगाव येथे स्वातंत्र्यसैनिक प्रकाश मोहाडीकर संस्कार मंच आयोजित देशभक्तीपर गीत पाठांतर स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यानी उस्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.दिलीप फलके सर यांनी मुलांना मार्गदर्शन केले. संगीताला जीवनात महत्वाचे स्थान आहे.

देशभक्तीपर गीते मुलांना पाठ असावेत त्यातुनच देशभक्ती मुलांच्या मनात निर्माण होते. हा या मागचा उद्देश आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून लोकांच्या मनात प्रेरणा निर्माण करण्याचे काम गीताने होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन जेष्ठ कलावंत मानधन समिती जिल्हा परिषद अहमदनगर सदस्य ह.भ.प.रामकिसन महाराज तापडीया हे होते. व शिवशाहीर अक्षय डोंगरे यांनी पोवाडा सादर केला. यावेळी जाधव सर व घाटे मॅडम यांनी स्पर्धेचे परिक्षण केले. स्पर्धेसाठी पाटेकर , मोटे आदी उपस्थित होते. स्पर्धकांना मार्गदर्शन तसेच संगीत देण्याचे काम शिक्षक भारस्कर यांनी केले. शिवशाहीर कल्याण काळे यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या. तर सुत्रसंचालन वनिता उबाळे, आभार सुनिता पायघन मानले.