Breaking News

श्रीपतराव पाटील हायस्कूलच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमसातारा, 
 करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रीपतराव पाटील हायस्कूलच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष तुषार पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रतिभा चव्हाण वत्सला डुबल, यादवसर यांची उपस्थिती होती.

संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण वर्षभर राबवण्यात येणार्‍या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना तुषार पाटील म्हणाले, या शाळेने आतापयर्र्ंत कला, क्रीडा, साहित्य, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच समाजोपयोगी उपक्रमांनी जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सातारा शुक्रवार दि. 7 रोजी सातारा शहरातून भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत शाळेतील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. सायकल रॅलीचा उद्देश इंधन बचतीचा संदेश देणे हा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शाळेच्या परिसरातच एक सुंदर बगीचा उभारण्याचे काम सध्या सुरु आहे. त्यासाठी दानशूर लोकांनी मदत केली आहे. सांस्कृतिक विभागात शाळेने राज्यस्तरापयर्र्त मजल मारली आहे. याशिवाय या शाळेचा बायोडिझेलचा उपक्रम राष्ट्रीय स्तरावर गौरवला गेला आहे. संस्थेच्या स्थापनेसाठी अविरत कष्ट घेणार्‍या संस्थापकांच्या जयंती आणि स्मृतीदिनानिमित्त विविध उपक्रम राबवण्याचे शाळेने ठरवले आहे. याशिवाय शाळेतील क्रीडा क्षेत्रात करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांना क्रीडा शिष्यवृत्ती देण्यात येते. त्याचा लाभही अनेक विद्यार्थ्यांनी घेतला आहे. शाळा प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या शनिवार ग्रामस्वच्छता अभियान राबवते यामध्ये करंजे परिसरातील अनेक भाग स्वच्छ करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांतर्गतच शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा गुणगौरवही होणार आहे. शाळेला अटल टिकरिंग लॅब मंजूर झाली असल्याचेही तुषार पाटील यांनी यावेळी सांगितले.