Breaking News

अ.भा.युवक मराठा महासंघाची जिल्हा आढावा बैठक संपन्न


नाशिक/प्रतिनिधी
मराठा महासंघाच्या ध्येय धोरणांचा प्रचार प्रसार करण्यासाठी गांव पातळीवर संघटना वाढविण्याचा निर्णय अखिल भारतीय युवक मराठा महासंघाच्या जिल्हा आढावा बैठकीत घेण्यात आला. 

महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रणजित जगताप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस दशरथ पिसाळ महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोषजी लांडगे व महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख तुषार जगताप यांच्या सुचनेनुसार व जिल्हा अध्यक्ष विलास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक संपन्न झाली.या बैठकीत नविन कार्यक्रमांचे नियोजन करणे,शाखा वाढविणे यासारख्या विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले.

या बैठकीस जिल्हाअध्यक्ष विलास जाधव, उपजिल्हाध्यक्ष निलेश मोरे, उपजिल्हाध्यक्ष संदिप लभडे, जिल्हा सरचिटणीस प्रशांत ओटे,बिजनेस फोरम मराठा महासंघ अध्यक्ष सचिन पवार, जिल्हा संपर्कप्रमुख मनोज जाधव, जिल्हाउपसंपर्क प्रमुख हेमंत मोरे, युवती जिल्हाध्यक्षा प्रियदर्शनीताई काकडे, युवक शहराध्यक्ष आप्पासाहेब गाडे, विद्यार्थी शहराध्यक्ष अमित नडगे, शहर प्रसिध्दी प्रमुख आकाश जगताप, सुरेश सोळंके, मनोज चव्हाण, अविनाश जाधव, सचिन इंगोले, अंकुश पाटील, गौरव पवार, सचिन शिंदे, सचिन वाबळे, कुणाल भवर, प्रशांत सोनवणे, निखिल गायकवाड, निखिल मगर,शरद जाधव, प्रविण बनकर, योगेश कदम, रोहित कोठुळे, राहुल कोठुळे, शंतनु वाघचौरे, मनिषा हाडोळे, मनिषा म्हस्के, चारुशीला शिंदे,प्रिती महाजन, शोभा वाघ, संजना पगार, अनिता सावंत, स्नेहल ठाकरे, मिनाक्षी भदाने व अखिल भारतीय युवक व युवती मराठा महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.