Breaking News

तडीपार गुंडाला सातार्‍यात अटक


सातारा (प्रतिनिधी) : घरफोडी, चोरी यासारखे गुन्हे दाखल असलेला तडीपार गुंड संजय एकनाथ माने (रा. सदरबाझार सातारा) हा सातारा शहरातून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने त्याला अटक केली. 

माने याच्यावर चोरी, घरफोडी यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला मे महिन्यात जिल्हा पोलीस प्रमुखांनी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले होते. या तडीपारी आदेशाचा भंग करून माने सातार्‍यातून फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि विकास जाधव व त्यांच्या सहकार्‍यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार माने याला सदर बाझार परिसरात सापळा लावून पोलिसांनी अटक केली. या कारवाईत सपोनि विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार मोहन घोरपडे, पोलीस नाईक प्रवीण फडतरे, नितीन गोगावले, नीलेश काटकर, विक्रम पिसाळ, मुबीन मुलाणी यांनी भाग घेतला.