Breaking News

गरोदर माता यांना चौरस आहार व ओटीभरण कार्यक्रमअंजनी बु.,(प्रतिनिधी): मेहकर तालुक्यातील अंजनी बु. येथे 4 डिसेंबर रोजी अंगणवाडी क्र. 1, 5 व 6 मध्ये गरोदर माता यांना चौरस आहार व ओटीभरण कार्यक्रम घेण्यात आला.

 एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प भाग-2 मेहकर यांच्या अंतर्गत येत असलेल्या प्र. बाल विकास प्रकल्प अधिकारी डिगांबर खटावकर, प्रवेशिका सीमा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गरोदर मातांना चौरस आहार देण्यात आला. यावेळी कविता केशव पायघन, तबसुम जुबेर अली, अर्चना प्रदीप नागोलकर, ज्योती हनुमान नागोलकर, अनिता गोपाल कळंबे या गरोदर मातांचा सरपंच गजानन टोनपे, उपसरपंच गजानन सरकटे, प्रवेशिका सीमा पवार, आरोग्यसेविका तुळसा चोंडकर, अंगणवाडी सेविका सुनीता पायघन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 गरोदर व स्तनदा मातांना आहाराविषयी मार्गदर्शन प्रवेशिका विधाता कवटकर, गजानन टोनपे, सीमा पवार, तुळसा चोंडकर, सुनीता पायघन यांनी केले. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये मंगला अंभोरे, कल्पना गायकवाड, मंगला देशमुख, मदतनीस उज्ज्वला पद्मने, लता चव्हाण, सुमन टाकळकर, नंदा नेहुल, अश्‍विनी ढोले, अश्‍विनी पारिस्कर, पूजा पायघन, लक्ष्मी ढोले, परवीन बी बेग, लक्ष्मी आल्हाट, आशा वर्कर्स रेखा चव्हाण, आरती जाधव, जरिता चव्हाण, केशव पायघन, समाधान पद्मने. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मंगला अंभोरे यांनी केले तर आभार सुनीता पायघन यांनी मानले.