Breaking News

श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेत क्रीडा मेळाव्यास उत्साहात सुरुवात


नगर । प्रतिनिधी -
 श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला (माध्यमिक), सावेडी या शाळेत वार्षिक क्रीडा मेळाव्याचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त विजेती श्वेता गवळी हिच्या हस्ते झाले. शाळेतील राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंनी क्रीडाज्योतीचे शानदार आगमन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. याप्रसंगी शालेय समिती चेअरमन अ‍ॅड. किशोर देशपांडे, संस्थेचे व्हा. चेअरमन डी. आर. कुलकर्णी, सांगळे गल्ली शाळेच्या प्राथमिक विभागाचे चेअरमन श्रीपाद  कुलकर्णी, शाळेच्या प्राचार्या तथा  मुख्याध्यापिका संगीता जोशी, पर्यवेक्षक एस. एम. कुलकर्णी उपस्थित होते.
याप्रसंगी श्वेता गवळी हिने सांगितले की, मुलांनी जिद्दीने खेळले पाहिजे, तसेच प्रत्येकाने क्रीडा मेळाव्याचा आनंद घ्यावा. संघातील सर्व खेळाडूंचे योगदान महत्त्वाचे असते. त्यामुळे संघ विजयी होण्यास मदत होते. खेळामुळे आत्मविश्वास वाढतो, तसेच सांघिक भावना वाढीस लागते.  विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळावेत व त्माचा मनसोक्त आनंद घ्यावा, असे अ‍ॅड. किशोर देशपांडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या संगीता जोशी यांनी केले. सूत्रसंचालन स्वप्ना कुलकर्णी यांनी केले, तर आभार क्रीडा शिक्षक पी. पी. लोंढे यांनी मानले.