ढोरजळगाव परिसरात ऊसाच्या शेतात बिबट्याचे दर्शन


शेवगाव/प्रतिनिधी
वनविभागाच्या कर्मचार्‍यांना चकवा देत ढोरजळगाव व परिसरात गेल्या दोन वर्षां पासून धुमाकूळ घालत दहशत निर्माण करणार्‍या बिबट्याने शेतकर्‍यांच्या ऊसाच्या शेतात दर्शन दिल्याने तसेच शेतकर्‍यांच्या गोठ्यातील शेळ्यावर हल्ला करून फडशा पाडल्याने परिसरातील शेतकर्‍यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी रात्री ढोरजळगावने येथील शेतकरी निलकंठ कराड यांच्या गट नंबर 248/1 मधील ऊसाचे पिकाला पाणी देण्यासाठी देविदास माळी गेले असता ऊसाच्या शेतात बिबट्या दिसला.

 त्यावेळी त्यांनी तेथुन पळ काढला सकाळी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी शिरिष निरभवने यांच्याशी संपर्क साधला असता वनरक्षक अप्पासाहेब घनवट यांनी त्वरीत निलकंठ कराड यांच्या शेतावर घटनास्थळी पाहणी केली त्या वेळी बिबट्याचे पग मार्क’ (पायाचे ठसे) आढळून आले. त्यानंतर त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली व बिबट्याला पकडण्यासाठी ताबडतोब पिंजरा लावण्यात येणार असल्याचे सांगितले. निंबे नांदुर शिवारातील पाचुंदा रस्त्यावरील चेके वस्तीवर दत्त्तात्रय रामभाऊ चेके यांच्या जनावरांच्या गोठयातील शेळीवर बिबटयाने हल्ला चढवला. त्यात एक शेळी ठार मारली तर एक शेळी उचलून नेल्याची माहिती दत्तात्रय चेके यांनी दिली.

 गेल्या दोन वर्षापासून ढोरजळगाव परिसरात बिबट्याने दहशत माजवली असून शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जाण्यास घाबरत आहेत. महावितरणच्या रात्री 1.45 ते 9.40 या वेळेत बदल करून दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी होत आहे. गेल्या वर्षी दत्तात्रय नवले ,जनार्दन नवले, मिठू थोरात यांच्या शेळ्यावर बिबट्याने डल्ला मारला होता त्यांना अद्यापही नुकसानभरपाई मिळालेली नाही.

शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात जातांना बँटरीचा प्रकाश फिरवावा, फटाके वाजवावेत, गाण्याचा मोठा आवाज करावा, टेभा पेटवावा वस्ती जवळ प्रकाश ठेवावा.
अप्पासाहेब घनवट वनरक्षक.

महावितरणच्या चुकीच्या वीजपुरवठा धोरणामुळे शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जीव धोक्यात घालून राबतो रात्रीच्या वेळी जंगली हिंस्त्र श्‍वापदे बिबट्या, वाघ, सिंह, रानडुक्कर, साप यांच्यापासुन मोठा धोका असतो. शेतकर्‍यांना स्वसंरक्षणासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक अधिकारी यांच्याकडुन शस्त्रपरवाना देण्यासाठी नेहमीच टाळाटाळ केली. वर्षांनुवर्षे शस्त्रपरवाना अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात कचर्‍यांच्या टोपलीत पडुन आहेत, किमान शेतकर्‍यांना शस्त्रपरवाना देण्यासाठी शासनाने योग्य निर्णय घ्यावा. 
निलकंठ कराड, शेतकरी ढोरजळगाव 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget