Breaking News

राष्ट्रवादी सोशल मिडीयाच्या जिल्हाध्यक्षपदी भंडारी यांची निवड झाल्याबद्दल सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यां पर्यंन्त पोचविण्यासाठी सोशल मिडीया महत्त्वाची भुमिका बजावत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाच्या जिल्हाध्यक्षपदी महावीर भंडारी यांची निवड झाल्याबद्दल विधानसभेचे मा.अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर, आ.वैभव पिचड, पांडुरंग अभंग, नरेंद्र घुले, अरुण कडू पाटील, शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, संदिप वर्पे, माजी महापौर अभिषेक कळमकर, किसनराव लोटके, माधवराव लामखडे, सभाजी गायकवाड, संजय कोळगे, कपिल पवार, विठ्ठल लंघे, निर्मला मालपाणी आदि उपस्थित होते. 
महावीर भंडारी यांचे सोशल मिडीयाच्या माध्यमातून चालू असलेल्या कामाचे वळसे पाटील यांनी कौतुक केले. सोशल मिडीया हे प्रभावी माध्यम बनले असून, पक्षाची ध्येय धोरणे नागरिकां पर्यंन्त पोहचत आहे. नागरिकांच्या देखील अपेक्षा यातून कळतात. या सेलचे उपाध्यक्ष म्हणून 3 वर्षे काम पाहिले असताना जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळाली असल्याचे महावीर भंडारी यांनी स्पष्ट केले.
मा.संपादक कृपया प्रसिध्दीसाठी....................

राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाच्या जिल्हाध्यक्षपदी महावीर भंडारी यांची निवड झाल्याबद्दल विधानसभेचे मा.अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर, आ.वैभव पिचड, पांडुरंग अभंग, नरेंद्र घुले, संदिप वर्पे, माजी महापौर अभिषेक कळमकर, विठ्ठल लंघे, निर्मला मालपाणी आदि.