Breaking News

जागतिक अपंग दिनानिमित्त दिव्यांग्य विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप


नेवासा/प्रतिनिधी
जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून नेवासा पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील दिव्यांग कक्षाच्या वतीने श्रवणयंत्रे, तीन चाकी सायकल आदी साहित्याचे वाटप नेवासा पंचायत समितीच्या सभापती कल्पनाताई पंडित यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षण विभागाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. दिव्यांग विद्यार्थ्यांना उंच भरारी जीवनात घेता यावी यासाठी पालकांनी न्यूनगंड न बाळगता पाल्याच्या भवितव्यासाठी पुढे यावे असे आवाहन कल्पनाताई पंडित यांनी यावेळी बोलतांना केले. यावेळी गटविकास अधिकारी शेखर शेलार, अरविंद घोडके, गटशिक्षणाधिकारी विलास साठे यांची भाषणे झाली. राहुल आठरे यांनी सूत्रसंचालन केले तर  सुधीर चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी शिक्षण विभागाच्या दिव्यांग गणेश लाड, सचिन खारगे, ज्ञानदेव जाधव, विजय पुंड, सचिन बेळगे यांच्यासह पालक जिल्हा परिषद व उर्दू शाळेच्या शिक्षिका व शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.