Breaking News

तांडा सुधार योजनेअंतर्गत एक कोटींच्या कामांना मंजुरी


शेवगाव/प्रतिनिधी
  वसंतराव नाईक तांडा/वस्ती सुधार योजनेअंतर्गत पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील विविध विकास कामांसाठी एक कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याचे आ. मोनिका राजळे यांनी सांगितले. यामध्ये पाथर्डी तालुक्यातील 10 गावांचा तर शेवगावमधील 7 गावांचा समावेश आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचेकडे या कामासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या सहकार्याने हा जास्तीचा निधी मंजूर झाला असल्याचे आ. राजळे यांनी सांगितले.
 यामध्ये पाथर्डी तालुक्यातील लांडकवाडी जॅक्सनतांडा येथे समाजमंदिर बांधणे 7 लक्ष रुपये, धनगरवाडी रूपालाचा तांडा येथे पाणीपुरवठा कामासाठी 7 लक्ष रुपये, जाटदेवळे शकूचातांडा  येथे समाजमंदीर बांधणे 6 लक्ष रुपये, बोरसेवाडी पवारतांडा येथे समाजमंदीर बांधणे 7 लक्ष रुपये, पत्र्याचातांडा - हरीचा तांडा येथे समाजमंदिर बांधणे 7 लक्ष रुपये, पत्र्याचातांडा वाघोली येथे पाणीपुरवठा कामासाठी 4 लक्ष रुपये, अल्हनवाडी काकडदरा तांडा येथे पाणीपुरवठा कामासाठी 7 लक्ष रुपये, अल्हनवाडी वाघदरा तांडा येथे समाजमंदीर बांधणे 7 लक्ष रुपये, अल्हनवाडी मालदारा तांडा येथे समाजमंदीर बांधणे कामासाठी 4 लक्ष रुपये, कोरडगाव खंडोबानगर येथे समाजमंदीर बांधणे 4 लक्ष रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. 
 शेवगाव तालुक्यातील शेकटे खु चिकणीतांडा येथे समाजमंदीर बांधणे 7 लक्ष रुपये, शेकटे खु बाळूबाई तांडा येथे समाजमंदीर बांधणे 7 लक्ष रुपये, लाडजळगाव कोकटवाडी तांडा येथे पाणीपुरवठा करणे 6 लक्ष रुपये , लाडजळगाव बारापट्टा  तांडा येथे पाणीपुरवठा करणे 6 लक्ष रुपये, राणेगाव लमाणतांडा पूर्व  येथे समाजमंदीर बांधणे 7 लक्ष रुपये, राणेगाव लमाणतांडा पश्‍चिम येथे समाजमंदीर बांधणे 7 लक्ष रुपयांचे कामांना मंजुरी मिळाली आहे.