Breaking News

राज्यस्तरीय स्पोर्टडांस स्पर्धेमध्ये मेहकर तालुक्याचे यश
मेहकर,(प्रतिनिधी): स्पोर्ट डांस फेडरेशन इंडियाच्या वतिने मुंबई येथे 1 व 2 डीसेंबर रोजी पार पडल्या. या राज्यस्तरीय स्पोर्टडांस स्पर्धेमध्ये मेहकर संघाने बाजी मारली. शास्रीय नृत्य, वेस्टर्न नृत्य, लोकनृत्य या प्रकारात ही स्पर्धा पार पडली. लोकनृत्य कलेमध्ये आठ वर्षाखालील वैयक्तिक नृत्यामध्ये सौम्या जैन या  चिमुकलीने उत्कृष्ट डांस सादर करुण  प्रथम क्रमांंक प्राप्त केला.

 विशेष म्हणजे सौम्या जैन ही अवघी 5 वर्षाची आहे. 10  वर्षाखालील जोडी लोकनृत्यात तेजस सपकाळ व श्रेयश सपकाळ यांनी प्रथम क्रमांंक प्राप्त केला. तसेच चौदा वर्षाखालील समूह लोकनृत्यात मेहकर येथील पियुष कामे, आयुष गवई, कौस्तुभ कुड्के, विवेक गायकवाड, श्रुष्टी निकस, श्रेया गवई, वंशिका रिंढे  यानी नृत्य सादर करत प्रेक्षकांची मने जिंकुण  दुसरा क्रमांक प्राप्त केला.

तसेच 14 वर्षाखालील एकल नृत्यात करण मंडल यानी तीसरा क्रमांक प्राप्त केला. या सोबत विद्यार्थ्यांची  हरियाणा मध्ये होणारया राष्ट्रियस्तरीय स्पर्धे साठी निवड झाली. या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यातुन 550 विद्यार्थ्यांचा सहभाग होता.  सलग विद्यार्थी मेहकर येथील वक्रतुण्ड डांस अकादमीचे  नृत्य दिग्दर्शक अनुराग आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली शिकत होते.विजेत्या विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी राजेश पवार, अभिषेक वाघमारे  उपस्थित होते.