Breaking News

जैन कॉन्फरन्सकडून गरजू महिलांना आर्थिक मदत


नगर । प्रतिनिधी -
समाजातील गरजूंची समस्या ओळखून त्यांना तत्परतेने आवश्यक ती मदत करण्यासाठी जैन कॉन्फरन्स ही मातृसंस्था तत्पर तयार असते. अशा कामामुळे समाजाला मिळणारा आनंद व संस्थेचा लौकिक वाढतो, असे प्रतिपादन सुभाष घिया यांनी केले.

अखिल भारतीय जैन कॉन्फरन्सच्या वतीने वरिष्ठ मार्गदर्शक विलास लोढा यांच्या पुढाकाराने समाजातील 45 गरजू भगिनींना प्रत्येकी 4 हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले. यावेळी श्री. घिया बोलते होते.
यावेळी लाभार्थी भगिनींसह जैन कॉन्फरन्सचे पदाधिकारी सुभाष घिया, विलास लोढा, राजेंद्र बोथरा, मनोज शेटिया, बाबुशेठ लोढा, रमेशचंद्र बाफना, बडीसाजनचे संचालक अजित कर्नावट, राजेंद्र बोथरा, दीपक बोथरा आदी सदस्य उपस्थित होते.

श्री बडीसाजन मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात 45 लाभार्थींना आर्थिक मदतीचा धनादेश वितरीत करण्यात आला. वरिष्ठ मार्गदर्शक रमेशचंद्र बाफना यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले.
विलास लोढा, मनोज शेटिया, सतीश लोढा यांनी संस्थेची माहिती दिली. देशातील प्रत्येक ठिकाणी गरजूला यथोचित मदत, सहाय्य उपलब्ध करुन देण्यासाठी संस्था सदैव तयार असते, असे त्यांनी सांगितले. लाभार्थींच्या वतीने श्रीमती संगीता भंडारी यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेला धन्यवाद दिले. राजेंद्र बोथरा यांनी आभार मानले.