Breaking News

नाशिक जिल्हा जुनी पेन्शन हक्क संघटनचा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा मेळावा


नाशिक
जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी नाशिक जिल्हा जुनी पेन्शन हक्क संघटनचा जिल्हा मेळावा येत्या जानेवारी महिन्यात जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री ना. दादाजी भुसे, खा. हरिश्चंद्र चव्हाण, खा. हेमंत गोडसे , आमदार डॉ. सुधीर तांबे, जि.प. अध्यक्षा ना. शीतल सांगळे, राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, राज्य सरचिटणीस गोविंद उगले , राज्य संपर्क प्रमुख लिंबराज भंडारे, राज्य मुख्य संघटक प्रविण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती संघटनचे जिल्हाध्यक्ष सचिन वडजे, जिल्हा सरचिटणीस गोरख देवढे यांनी दिली.

तसेच यावेळी पेन्शनच्या लढयास नेहमी सहकार्य करणारे आ. नरहरी झिरवाळ, आ. अनिल कदम, शिक्षक मतदार संघाचे आ. किशोर दराडे आदी आमदार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
१ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत लागलेल्या सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना हक्काची जुनी पेन्शन योजना नाकारून अन्यायकारक नवीन अंशदायी पेन्शन योजना लादून शासनाने सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधकारमय केले आहे. मृत कर्मचाऱ्यांना पेन्शन नसल्याने त्यांची कुटूंबे अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत.
जुनी पेन्शन हक्क संघटन तर्फे गेल्या चार वर्षापासुन राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये व विधीमंडळाच्या प्रत्येक अधिवेशना वर हजारोंच्या संख्येने मोर्चे व आंदोलने करण्यात आलेली आहे. त्यामुळे सरकारने जनतेची ५८ वयापर्यंत सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करावी अशी सर्व कर्मचारी संघटनांकडून मागणी केली जात आहे.
नाशिक जिल्हयाच्या या मेळाव्यास सर्व शिक्षक संघटना, कर्मचारी संघटनांचे राज्य , जिल्हा नेते उपस्थित राहणार असुन जिल्हातील ५००० पेक्षा अधिक डिसीपीएस धारकांनी आपल्या न्याय हक्कासाठी स्वतःच्या कुटूंबासह नियोजित कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन नाशिक जिल्हा जुनी पेन्शन हक्क संघटनच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांतर्फे करण्यात आले आहे.