Breaking News

जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी


अहमदनगर (प्रतिनिधी)- गावाच्या विकासासाठी कटिबध्द असणारे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या मानधनात वाढ करण्याच्या 27 ग्रामपंचायतीचे मागणीचे निवेदन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने नुकतेच देण्यात आले.


यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, निवृत्ती भाबड,संतोष शिंदे, बन्सी दारकुंडे, विठ्ठल लगड, संजय पटेकर, कुशल घुले, अशोक शिरसाठ, रामदास आंधळे, संदीप जावळे, मदन पालवे, सुभाष निंबाळकर, गणेश पालवे, तुषार पोटे, कैलास गर्जे आदि उपस्थित होते.

महाराष्ट्रातील गाव पातळीवर सरपंच अत्यंत तोकड्या मानधनात काम करत आहे. सरपंच पदाची निवड जनतेतून होत असल्याने त्यांची जबाबदारी आनखी वाढली आहे. गावातील जनेतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सरपंच व उपसरपंच यांना पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद येथे अनेक वेळा जावे लागते. तसेच वेळप्रसंगी बाहेर गावी सुध्दा जावे लागते. अत्यंत तोकड्या मानधनात गावाच्या विकासाचे कामकाज पहाणे त्यांना जिकरीचे होत असून त्यांना पदरखर्च करावा लागत आहे.

 त्यांच्या मानधनात वाढ झाल्यास गावाच्या विकासासाठी आनखी ते झपाट्याने काम करु शकणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. सरपंचास 10 हजार, उपसरपंचास 5 हजार तर ग्रामपंचायत सदस्यांना 2 हजार रुपये महिन्याला मानधन मिळण्याची मागणी फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यासह गोंदिया, सातारा व औरंगाबाद येथील एकूण 27 गावांचे निवेदन मुंडे यांना देण्यात आले. तसेच सदर निवेदन मुख्यमंत्री व राज्यपाल यांना पाठविण्यात आले आहे.

जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या मानधनात वाढ करण्याच्या मागणीचे निवेदन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना देऊन त्यांचा तिरंगा ध्वज देत सत्कार करताना फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, निवृत्ती भाबड,संतोष शिंदे, बन्सी दारकुंडे, विठ्ठल लगड, संजय पटेकर, कुशल घुले, अशोक शिरसाठ, रामदास आंधळे, संदीप जावळे, मदन पालवे, सुभाष निंबाळकर, गणेश पालवे, तुषार पोटे, कैलास गर्जे आदि.