मोदींच्या राज्यात ईव्हीएम मशीन्सकडे अदृश्य शक्ती; राहुल गांधी यांची टीका; राजस्थानमध्ये रस्त्यावर आढळले ईव्हीएम


नवीदिल्ली/ जयपूरः पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. आता निकालात काय होणार हे 11 डिसेंबरला स्पष्ट होणार आहे. याच पार्श्‍वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींच्या राज्यात देशभरातल्या ईव्हीएम मशीन्सकडे अदृश्य शक्ती असल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे. 

मध्य प्रदेशात निवडणुका पार पडल्यानंतर ईव्हीएम मशीन घेऊन जाणारी एक स्कूल बस काही लोकांनी गायब केली. ही बस दोन दिवस गायब होती. यावरूनच हे लक्षात येते, की मोदी सत्तेवर असताना भारतात ईव्हीएमकडे अदृश्य शक्ती आहे. राहुल यांनी ही टीका केली असताना आता मोदी किंवा भाजपा नेते त्यांना कसे उत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. निवडणुकांचे सगळे टप्पे 7 डिसेंबरला संपले. त्यानंतर सगळ्याच एक्झिट पोल्सनी मध्य प्रदेशात काँग्रेस आणि भाजपची काँटे की टक्कर होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. राजस्थानात काँग्रेसची सत्ता येईल, असा सर्वंच पाहण्यांचा अंदाज आहे. आता नेमके काय होणार, याचे चित्र मंगळवारी स्पष्ट होईलच; मात्र राहुल गांधींनी निकालाच्या आधीच टीका करून टायमिंग साधले आहे.
मध्यप्रदेश आणि राजस्थान या दोन्ही राज्यातल्या विधानसभा निवडणुका काँग्रेस आणि भाजपने प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. या दोन्ही राज्यात काय होणार, हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. मध्य प्रदेशातली सत्ता गमावणे हा भाजपसाठी मोठा धक्का असू शकतो. मध्य प्रदेशात काही मशीन हॉटेलमध्येही आढळल्या होत्या. मध्य प्रदेश पाठोपाठ राजस्थानमध्येही ईव्हीएम सुरक्षेचा बोजवारा उडाला आहे. राजस्थानमध्ये मतदाना पार पडल्यानंतर ’ईव्हीएम’ चक्क रस्त्यावर पडून असल्याचे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेताना दोन अधिकार्‍यांना निलंबित केले. किशनगंज विधानसभा मतदारसंघातील शहाबाद क्षेत्रामध्ये मतदान कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला. राष्ट्रीय महामार्ग 27 वर सीलबंद असलेले ’ईव्हीएम’ बेवारस स्थितीत आढळून आले. मतदान झाल्यानंतर ’ईव्हीएम’ सीलबंद करण्यात आले होते. 


ईव्हीएमशी छेडछाड नाही

बेवारस अवस्थेत आढळलेल्या त्या ’ईव्हीएम’सोबत कोणत्याही प्रकारची छेडछाड झालेली नाही. बेवारस ’ईव्हीएम’ची माहिती मिळताच शहाबादमधील निवडणूक अधिकारी नारायण राम यांनी घटनास्थळी धाव घेत ईव्हीएम ताब्यात घेतले. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget