Breaking News

डोणगाव येथील कृषी प्रदर्शनीला शेतकर्‍यांचा प्रदिसाद


मेहकर,(प्रतिनिधी) डोणगाव येथे 1 डिसेंबर पासून जिल्हास्तरीय दोन दिवसीय कृषि प्रदर्शनाचे संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने आयोजन करण्यात आले असून शेतकर्‍यांनी गर्दी केली होती.  संत गजानन महाराज संस्थान डोणगावच्या  वतीने मोठे  डोम उभारण्यात आले आहेत. भविष्यात जमिनीशि अल्प मनुष्यबळात, कौशल्य आधारित शेती शक्य आहे. यांत्रिकीकरणाचा पुरस्कार करीत आता जमिनीच्या मशागतीपासून  तर थेट पक्का माल ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात यंत्रांची मदत कशी घेतली जाते

. याचे प्रात्यक्षिकच  येथे उपलब्ध आहे. संगणक नियंत्रित सिंचन प्रणाली, फवारण्याचे तंत्र, अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा  प्रभावी वापर, उपग्रहाच्या माध्यमातून अचूक हवामान अंदाज, अत्याधुनिक, स्वयंचलित शेती  अवजारे, समूह शेती, गटशेतीची वाढत चाललेली व्याप्ती, नैसर्गिक, सेंद्रिय शेतीप्रती झुकलेला  कल, एकात्मिक पीक तथा अन्नद्रव्य व्यवस्थापन  सामाजिक संस्थांच्या  सहयोगाने मोबाइल संदेश, टीव्ही, रेडिओ, इंटरनेटचा वापर करीत प्रयोगशाळेत विकसित झालेले तंत्रज्ञान शेतकर्‍यांच्या बांधावर वेळेत कसे पोहोचविले जाणार याची माहितीही येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

संशोधित कृषी तंत्रज्ञान सर्व घटकांना एकाच जागी बघता  यावे, सोबतच शेती शाश्‍वत आणि शेतकरी समृद्ध करण्यासाठी आपले योगदान देणार्या  विविध शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक, खासगी कंपन्यांची उत्पादने प्रत्यक्ष हाताळता यावे आणि  शंका समाधान करता यावे, या उद्देशाने प्रदर्शनाचे नियोजन करण्यात आले होते. या कृषी  प्रदर्शनात एकूण 51 नवनवीन कृषी उपयोगी असणारे रासायनिक औषधे वेगळ्या कंपनीचे ट्रॅक्टर्स सिंचनासाठी अत्याधुनिक पद्धतीचे स्प्रिंकलर ड्रिप कृषी विभागातून विभागातर्फे तालुक्यातील उत्कृष्ट उत्पादन केलेल्या फळभाज्या पिके व फुलांचा आगळगाव स्टॉल साकारण्यात आला होता. प्रदर्शनामध्ये आकर्षण ठरलेल्या महिला बचत गटाचे आरोग्यासाठी उपयुक्त असलेले व  आपल्या गटातील महिलांनी तयार केलेले सफेद मुसली पावडर गव्हापासून बनवलेले फुटाणे आवळ्याचे पदार्थ ह्या महिला जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरून म्हणजेच जळगाव जामोद तालुक्यातील ह्या महिला आलेल्या होत्या.