Breaking News

पंढरपुरची भरपाई ञंबकेश्वरच्या महापुजेने;संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या महापुजेचा मान मुख्यमंञ्यांना मिळण्याचे संकेत


दिड महिन्यावर येऊन ठेपलेल्या संत निवृत्तीनाथ महाराज याञेनिमित्त संतश्रींच्या महापुजेचा मान
मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना देण्याचे प्रयोजन असल्याचे संकेत आहेत.आषाढी एकादशीला पंढरपूर येथील महापुजेला मुख्यमंञ्यांना मराठा आरक्षण चळवळीने रोखले होते,त्याची भरपाई म्हणून वारकरी आणि विश्वस्त मंडळींनी संत निवृत्तीनाथांची महापुजा करण्याचा मान देवेंद्र फडणवीस यांना देण्याचा विचार पुढे आल्याची चर्चा आहे.

यासंदर्भात संतश्रींचे भक्तगण,वारकरी,संत निवृत्तीनाथ विश्वस्त मंडळ ,स्थानिक नागरिकांसह ञंबकेश्वर नगरपालिका आग्रही असल्याचे समजते. 

आषाढी एकादशीला महाराष्ट्राच्या मुख्यमंञ्यांनी पांडूरंगाची महापुजा करण्याची परंपरा आहे.गेल्या आषाढी एकादशीला मराठा आरक्षणाचा मुद्दा चव्हाट्यावर येऊन मराठा तरूण आक्रमक झाला आणि आरक्षण नाही तर महापुजा नाही ही भुमिका घेऊन मुख्यमंञ्यांच्या हस्ते होणारी महापुजा रोखली होती.

आरक्षणाचा मुद्दा तुर्तास निकाली निघाला असून मराठा समाजाचा रोषही कमी झाला आहे.आषाढी एकादशीला महापुजा करण्याची हुकलेली संधी निवृत्ती नाथांच्या महापुजेचा मान देऊन त्याची भरपाई करण्याचा उद्देश या निमंञणामागे असावा असा कयास बांधला जातोय. दरम्यान संत निवृत्तीनाथ मंदीर जिर्णोध्दार आणि परिसरासाठी देवस्थनने शासनाकडे २५ कोटींची मागणी केली असून त्याचे साकडे घालण्यासाठीमुख्यमंञ्यांना निमंञीत केले जाणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंञ्यांच्या या संभाव्य महापुजेविषयी ञंबकेश्वर नगरपालिका अंतिम निर्णय घेणार असल्याचे समजते.