Breaking News

स्त्री मुक्ती परिषदेच्या नियोजन बैठकीस उपस्थित रहा -पुष्पाताई तुरुकमारे


बीड, (प्रतिनिधी): २५ डिसेंबर हा दिवस भारिप बहुजन महासंघ स्त्री मुक्ती दिन म्हणून दरवर्षी साजरा करतो या दिवसाचे महत्त्व असे की २५ डिसेंबर १९२७ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड मुक्कामी विषमतावादी समाज व्यवस्थेचा पुरस्कार करणार्‍या मनुस्मृती या ग्रंथाचे दहन करून भारताच्या स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तत्त्वावर आधारलेल्या राज्य घटनेचा पाया घातला होता, तरी हा दिवस जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कसा साजरा करता येईल म्हणून दिनांक १८ डिसेंबर रोजी शासकीय विश्रामगृह बीड येथे ठीक १:०० वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे तरी या बैठकीस भारिप-बहुजन महासंघाच्या सर्व पदाधिकार्‍यांनी कार्यकर्त्यांनी तसेच युवक आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, महिला आघाडी व भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून या नियोजन बैठकीत आपले बहुमोल मत मांडावे असे आवाहन भारिप बहुजन महासंघ महिला जिल्हाध्यक्ष  पुष्पाताई तुरुकमाने भारिप जिल्हा रवींद्र पाटोळे सरचिटणीस राहुल वडमारे युवक जिल्हाअध्यक्ष संतोष जोगदंड सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष डॉ. प्रा. गणेश खेमाडे, बबन वडमारे, एस. ए. सोनवणे आदींनी केले आहे.